Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदर विमानतळासाठीच्या भूसंपादनासाठी 920 एकर जमिनीसाठी संमतीचे करार; मुळ शेतकऱ्यांना प्राधान्य

पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी आत्तापर्यंत ७ गावांतील शेतकऱ्यांकडून ९२० एकर जमिनीसाठी संमतीचे करारनामे झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 15, 2026 | 10:58 AM
पुरंदर विमानतळासाठीच्या भूसंपादनासाठी 920 एकर जमिनीसाठी संमतीचे करार; मुळ शेतकऱ्यांना प्राधान्य

पुरंदर विमानतळासाठीच्या भूसंपादनासाठी 920 एकर जमिनीसाठी संमतीचे करार; मुळ शेतकऱ्यांना प्राधान्य

Follow Us
Follow Us:

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी आत्तापर्यंत ७ गावांतील शेतकऱ्यांकडून ९२० एकर जमिनीसाठी संमतीचे करारनामे झाले आहेत. एकूण हव्या असलेल्या ३ हजार ४० एकर जमिनीच्या तुलनेत हे प्रमाण ३०.२६ टक्के इतके आहे. दरम्यान, जमिनीच्या मोबदल्यापोटी गेल्या तीन दिवसांमध्ये मुळ शेतकऱ्यांना एकूण ११५ कोटी रुपयांच्या रकमेचे वाटप केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

 

डुडी म्हणाले, पुरंदर येथील जमिनीच्या मोबदल्यात रक्कम देताना प्राधान्य मुळ शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. त्यांना प्रथम ही मोबदला रक्कम दिली जात आहे. त्यानंतर गुंतवणूकदारांचा विचार केला जाणार आहे. शेतकऱ्यांसोबत करारनामा केला की त्याचवेळी त्यांच्या बँक खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे मोबदला रक्कम जमा केली जात आहे. शेतकऱ्यांना मोबदला रक्कम देण्यापुर्वी नोटीस बजावली जात आहे. सर्व बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नोटीस काढण्यात आली आहे. त्यातील काही शेतकऱ्यांना नोटीसा मिळाल्या आहेत. तर, काही शेतकऱ्यांना एक ते दोन दिवसांमध्ये मिळतील.

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नोटीसमध्ये जमिनीचा एकूण मोबदला तसेच, जमिनीव्यतिरिक्त विहिरी, बोअरवेल, घरे, शेड, झाडे आदी निगडीत घटकांचे स्वतंत्र मूल्यांकन करून त्यांची संख्या आणि मोबदला रक्कम नोटीसमध्ये नमूद केली जात आहे. यामध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतजमिनीव्यतिरिक्त विहिरी, बोअरवेल, घरे, शेड, झाडे यापैकी कशाचेही मुल्यांकन बाकी असल्याचे आढळल्यास ती बाब शेतकऱ्यांनी निदर्शनास आणुन द्यावी. त्यानुसार कार्यवाही केली जाईल.

जमिनीवरील बोझा हटविण्यासाठी सुलभता

पुरंदर विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या शेतजमिनीवर कर्जाचा बोझा असल्यास तो हटविण्यासाठी सुलभ कार्यवाही केली जाणार आहे. शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून मोबदला रक्कम दिल्यानंतर त्यांनी बँकांना जमिनीवरील कर्जाचा बोझा हटविण्यासाठी धनादेश द्यावा. त्यानंतर बँकांकडून देखील शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्जाचा बोझा आहे त्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यातून तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

पुरंदर विमानतळ प्रकल्प रद्द झाला की शेतकऱ्यांना दिलेली मोबदला रक्कम २५ टक्के व्याजासह परत घेतली जाईल, अशी चुकीची अफवा पसरविली जात आहे. त्याशिवाय, आत्ता जमिनीचा संमती करारनामा करू नका. नंतर मोबदला रक्कम वाढेल, असेही सांगितले जात आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येईल. शेतकऱ्यांनी अधिकृत माहिती भूसंपादन अधिकाऱ्यांकडून घ्यावी, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी.

हे सुद्धा वाचा : ‘व्हीआयपीं’च्या पुणे दौऱ्याचा ताफा आता निम्म्यावर! पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय

Web Title: Consent agreements are being signed with farmers for land acquisition for purandar airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • Farmers
  • Purandar Airport
  • Purandar airport project

संबंधित बातम्या

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
1

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
2

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?
3

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?

पिके करपली, शेतकरी संकटात; इंदापुर तालुक्यात कृषिमंत्री भरणेंनी घेतला नुकसानीचा आढावा
4

पिके करपली, शेतकरी संकटात; इंदापुर तालुक्यात कृषिमंत्री भरणेंनी घेतला नुकसानीचा आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.