Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांसाठी Runaway/ Escape Ramp उभारा; रविंद्र साळेगावकर यांची गडकरींकडे मागणी 

राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या व अपघातप्रवण ठिकाणी Runaway / Escape Ramp उभारण्यात यावेत, अशी मागणी रविंद्र साळेगावकर यांनी केली आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 17, 2026 | 05:29 PM
राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांसाठी Runaway/ Escape Ramp उभारा; रविंद्र साळेगावकर यांची गडकरींकडे मागणी 

राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांसाठी Runaway/ Escape Ramp उभारा; रविंद्र साळेगावकर यांची गडकरींकडे मागणी 

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटना वाढत असून, देशातील राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या व अपघातप्रवण ठिकाणी Runaway / Escape Ramp उभारण्यात यावेत, अशी मागणी भाजप पुणे शहर सरचिटणीस व पुणे महानगरपालिका नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

देशातील अनेक राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होते. अनेकदा वाहनांचे अचानक ब्रेक फेल होणे, तांत्रिक बिघाड होणे किंवा उताराच्या रस्त्यावर वाहनाचा वेग नियंत्रणाबाहेर जाणे यामुळे गंभीर अपघात घडतात. अशा परिस्थितीत चालकाला वाहन सुरक्षितपणे मुख्य मार्गापासून दूर घेऊन नियंत्रित पद्धतीने थांबविण्यासाठी Runaway /Escape Ramp अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. विशेषतः पुणे परिसरातील काही अपघातप्रवण ठिकाणी ब्रेक फेल होणे, उतारावरून वेगाने येणारी जड वाहने आणि वाहतूक कोंडी यामुळे गंभीर अपघात घडत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा ठिकाणांची तांत्रिक पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी एस्केप रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गाचे सुरक्षा ऑडिट व तांत्रिक सर्वेक्षण करून अपघातप्रवण आणि तीव्र उताराच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार Runaway / Escape Ramp उभारण्याबाबत केंद्र सरकारने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी साळेगावकर यांनी केली आहे. या सुविधेमुळे ब्रेक फेल किंवा तांत्रिक बिघाड झालेल्या जड वाहनांना सुरक्षितपणे थांबविण्यास मदत होऊन मोठ्या प्रमाणावर होणारे अपघात टाळता येतील. तसेच वाहनचालक, प्रवासी आणि इतर नागरिकांच्या जीविताचे संरक्षण होण्यास मदत होईल. “नागरिकांच्या जीविताची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असून, राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात कमी करण्यासाठी आधुनिक आणि प्रभावी सुरक्षा उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. Runaway / Escape Ramp ही त्यासाठी महत्त्वाची सुविधा ठरू शकते,” असे रविंद्र साळेगावकर यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : वाहतूक पोलिसांचा आता पालिकेला ‘अलर्ट’; कारणे शोधून उपाययोजना करण्याचे पोलिस आयुक्तांचे निर्देश

Web Title: Corporator ravindra salegaonkar has made an important request to nitin gadkari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Accident
  • Nitin Gadkari
  • pune news

संबंधित बातम्या

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
1

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक

Accident News : हेल्मेट हँडलला अन् काळाचा घाला; अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
2

Accident News : हेल्मेट हँडलला अन् काळाचा घाला; अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Accident News: रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
3

Accident News: रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती
4

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.