Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिंभे धरणातून पाणी गळती, धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्या; वळसे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कुकडी संयुक्त प्रकल्पांतर्गत असलेल्या डिंभे धरणातून मोठ्या प्रमाणावरील पाणी गळती होत आहे. याबाबत माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 26, 2026 | 12:30 AM
डिंभे धरणातून पाणी गळती, धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्या; दिलीप वळसे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

डिंभे धरणातून पाणी गळती, धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्या; दिलीप वळसे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Follow Us
Follow Us:

मंचर : कुकडी संयुक्त प्रकल्पांतर्गत असलेल्या डिंभे धरणातून मोठ्या प्रमाणावरील पाणी गळती होत आहे. याबाबत माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या गंभीर प्रश्नाकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदनाद्वारे तातडीने लक्ष वेधण्यात आले. धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे.

 

धरण सुरक्षा पुनर्विलोकन समिती आणि सीडब्लूपीआरएस, पुणे यांनी केलेल्या तांत्रिक तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धरणातून सध्या सुमारे १४०० लिटर प्रति सेकंद इतकी प्रचंड गळती होत आहे. या गळतीमुळे धरणातील सिमेंट बाहेर पडत आहे. यामुळे धरणाची संरचनात्मक मजबुती धोक्यात येण्याची शक्यता आहे. भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी धरणाचे बळकटीकरण करणे तातडीचे असल्याचे वळसे पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.

१७१.५९ कोटींचा प्रस्ताव प्रलंबित

डिंभे धरणाच्या दुरुस्ती व बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने १७१.५९ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा व प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र, हा प्रस्ताव सध्या शासन स्तरावर मान्यतेसाठी प्रलंबित आहे.

प्रमुख मागण्या काय?

धरण सुरक्षा कायदा २०२१ च्या तरतुदींनुसार, धरणाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रलंबित प्रस्तावास तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी. दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा. पावसाळ्यापूर्वी आणि पुढील संभाव्य हानी टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू कराव्यात.

हे सुद्धा वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजप अन् RSSचे राष्ट्रीय धोरण, त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

…तर भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो

“डिंभे धरण हे या परिसराची जीवनवाहिनी आहे. धरणातून होणारी गळती ही केवळ तांत्रिक बाब नसून ती सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने आणि शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी या विषयात स्वतः लक्ष घालून तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी वळसे पाटील यांनी केली आहे.”

Web Title: Dilip walse patil has made a big demand from chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Dilip Walase Patil
  • Dilip Walse

संबंधित बातम्या

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
1

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…
2

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
3

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

खड्ड्यांचे साम्राज्य अन् ट्रॅफिकचा फास, चाकणमधून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार? हजारो जणांचे रोजगार धोक्यात
4

खड्ड्यांचे साम्राज्य अन् ट्रॅफिकचा फास, चाकणमधून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार? हजारो जणांचे रोजगार धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.