Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदर तालुक्यात गॅस वितरण व्यवस्थेचा बोजवारा, वशिलेबाजांना प्राधान्य; सामान्य नागरिक मात्र रांगेत उभा

पुरंदर तालुक्यात सिलिंडर गॅस वितरणाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. गावोगावचे छोटे वितरक आणि ग्राहकांमध्ये वाद होत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 31, 2026 | 06:45 PM
पुरंदर तालुक्यात गॅस वितरण व्यवस्थेचा बोजवारा, वशिलेबाजांना प्राधान्य; सामान्य नागरिक मात्र रांगेत उभा

पुरंदर तालुक्यात गॅस वितरण व्यवस्थेचा बोजवारा, वशिलेबाजांना प्राधान्य; सामान्य नागरिक मात्र रांगेत उभा

Follow Us
Follow Us:
  • पुरंदर तालुक्यात गॅस वितरण व्यवस्थेचा बोजवारा
  • वशिलेबाजांना प्राधान्य
  • सामान्य नागरिक मात्र रांगेत उभा
सासवड/संभाजी महामुनी : पुरंदर तालुक्यात सिलिंडर गॅस वितरणाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. नियमाप्रमाणे बुकिंग केल्यानंतर निर्धारित वेळेत सिलेंडर टाकी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सासवडमधून ग्रामीण भागातील वितरकांकडे होणारा पुरवठा पूर्णपणे बंद केल्याने नागरिकांना सासवडच्या केंद्रावर नाईलाजास्तव उन्हात तासनतास उभे राहावे लागत आहे. वशिलेबाजांना प्राधान्य दिले जात आहे. सामान्य नागरिक मात्र रांगेत उभा आहेत, असं नागरिकांनी सांगितलं आहे.

 

युद्धजन्य परिस्थितीत केंद्र आणि राज्य शासनाने नागरिकांना घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर गॅस वापरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध आणले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे सिलिंडरवरती अवलंबून असलेल्या कुटुंबियांच्या मोठ्या प्रमाणात अडचणी वाढल्या आहेत. सासवडमधील प्रविण गॅस एजन्सी हे पुरंदर तालुक्याचे गॅस वितरणाचे मुख्य केंद्र आहे. येथूनच तालुक्याच्या ग्रामीण भागात सिलिंडर टाक्यांचा पुरवठा करण्यात येतो. युद्धजन्य परिस्थितीत वितरण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी सासवडमधून ग्रामीण भागातील पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे गावोगावचे छोटे वितरक आणि ग्राहकांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली.

हे सुद्धा वाचा : सिलेक्टिव्ह व्हिडिओ लिक करण्यामागे गृहविभागाचा कुटील डाव; खरात प्रकरणावरुन काँग्रेसचा आरोप

वितरण निरीक्षक नामधारी आणि कुचकामी

पुरंदर तालुक्यातील नागरिकांना सिलिंडर टाक्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा, नागरिकांना त्रास होवू नये यासाठी तहसील कार्यालयाकडून गोपाळ ठाकरे हे पुरवठा आणि वितरण निरीक्षक म्हणून कामकाज पाहत आहेत. मात्र, सासवडच्या वितरण केंद्रावर ग्राहकांची शेकडोंच्या संख्येने गर्दी होत आहे. तरीही वितरक आणि ग्राहक यांच्यात अक्षरशः हाणामारीच्या घटना घडत आहेत, पोलिसांना बोलावून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, पुरवठा निरीक्षक गोपाळ ठाकरे हे कुठेही दिसून येत नाहीत. पुरवठा निरीक्षक केवळ नामधारी आणि कुचकामी ठरले आहेत.

Web Title: Disputes are taking place between gas distributors and consumers in purandar taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • Gas Cylinder
  • lpg cylinder
  • Purandar News

संबंधित बातम्या

LPG Price : अरे वा…! महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, ‘हे’ आहेत नवे दर
1

LPG Price : अरे वा…! महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, ‘हे’ आहेत नवे दर

LPG Rules: 3-4 किलोमीटर लांब जाऊन भरताय एलपीजी सिलेंडर? गॅस एजन्सी देतेय धोका, काय आहे नक्की नियम
2

LPG Rules: 3-4 किलोमीटर लांब जाऊन भरताय एलपीजी सिलेंडर? गॅस एजन्सी देतेय धोका, काय आहे नक्की नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.