Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: गणवेश हा राष्ट्राच्या विश्वासाचे कवच- डॉ. किरण बेदी, एनडीएच्या १५०व्या दीक्षांत समारंभात कॅडेट्सना ‘देश प्रथम’चा संदेश

खडकवासला येथील एनडीएच्या (NDA) १५० व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ पार पडला. माजी आयपीएस किरण बेदी यांच्या उपस्थितीत ३५० कॅडेट्सना पदवी प्रदान करण्यात आली, ज्यात १८ महिलांचा समावेश आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 29, 2026 | 08:19 PM
Pune News: गणवेश हा राष्ट्राच्या विश्वासाचे कवच- डॉ. किरण बेदी, एनडीएच्या १५०व्या दीक्षांत समारंभात कॅडेट्सना ‘देश प्रथम’चा संदेश
Follow Us
Close
Follow Us:
  • गणवेश हा राष्ट्राच्या विश्वासाचे कवच- डॉ. किरण बेदी
  • एनडीएच्या १५०व्या दीक्षांत समारंभात कॅडेट्सना ‘देश प्रथम’चा संदेश
पुणे, शहर प्रतिनिधी: ‘देश प्रथम हीच प्रत्येक अधिकाऱ्याची खरी ओळख असली पाहिजे. गणवेश हा केवळ सत्ता किंवा अधिकाराचे प्रतीक नसून तो नागरिकांच्या विश्वासाचे आणि संरक्षणाचे कवच आहे,’ असे प्रतिपादन माजी आयपीएस अधिकारी आणि पुदुच्चेरीच्या माजी उपराज्यपाल डॉ. किरण बेदी यांनी केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १५०व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

खडकवासला येथील एनडीएच्या हबीबुल्ला हॉलमध्ये शुक्रवारी (ता. २९) हा भव्य समारंभ पार पडला. यावेळी कमांडंट व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी, प्राचार्य डॉ. विनय दीप, एअर व्हाइस मार्शल राजेश वर्मा, वरिष्ठ लष्करी अधिकारी तसेच कॅडेट्सचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बेदी यांनी आपल्या भाषणात एनडीएमधील प्रशिक्षणाचे कौतुक करताना सांगितले की, येथे केवळ असामान्य विद्यार्थीच प्रवेश मिळवतात आणि कठोर प्रशिक्षणातून घडलेले हे कॅडेट्स भविष्यात विकसित भारताचे शिल्पकार ठरणार आहेत. बदलत्या युद्धनीती, सायबर क्षेत्रातील वाढती आव्हाने आणि नेतृत्वातील प्रामाणिकतेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी कॅडेट्सना राष्ट्रहित सर्वोच्च मानण्याचा संदेश दिला.

‘नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणे नव्हे, तर कठीण परिस्थितीत जबाबदारी स्वीकारणे, प्रामाणिक निर्णय घेणे आणि स्वतःच्या कृतीतून उदाहरण निर्माण करणे होय,’ असे त्या म्हणाल्या. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी राष्ट्रनिष्ठा आणि तयारीचे महत्त्व स्पष्ट केले. ‘२०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात प्रवेश करेल, तेव्हा आजचे हे कॅडेट्स देशाच्या महत्त्वाच्या नेतृत्वपदांवर असतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Pune News : पुण्यात बाह्य रिंग रोडच्या कामांना गती; खडकवासलावर पूल होणार तर सिंहगड किल्ल्याजवळ…

कमांडंट व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि जागतिक संघर्षांतून तंत्रज्ञानाचा वाढता वापर स्पष्ट झाला आहे. अशा काळात लष्करी अधिकाऱ्यांनी विद्वान योद्धा म्हणून स्वतःला विकसित करणे गरजेचे आहे. पदवी हे शिक्षणाचा पूर्णविराम नसून निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेची सुरुवात आहे. त्यामुळे छात्रांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षेसारख्या नव्या क्षेत्रांचा अभ्यास सुरू ठेवावा.’

प्राचार्य डॉ. विनय दीप यांनी प्रबोधिनीचा वार्षिक शैक्षणिक अहवाल सादर करताना, ‘एनडीएचे उद्दिष्ट छात्रांमध्ये केवळ घोकंपट्टी नव्हे, तर विश्लेषणात्मक कौशल्ये, निर्णयक्षमता आणि देशप्रेम विकसित करणे आहे,’ असे सांगितले.

दरम्यान, विविध शाखांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या छात्रांना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. बी.एससी शाखेत प्रथम आलेल्या पियुष रौतेला याला ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ ट्रॉफी’, बी.एससी कॉम्प्युटर सायन्समध्ये अव्वल ठरलेल्या रणविजय त्यागी याला ‘चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ट्रॉफी’, कला शाखेत प्रथम आलेल्या सुशांत वर्मा याला ‘चीफ ऑफ एअर स्टाफ ट्रॉफी’, तर बी.टेक शाखेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या मन्नेला नितीन याला ‘सीआयएससी ट्रॉफी’ देऊन गौरविण्यात आले.

एनडीए १५०वी तुकडी

  • एकूण विद्याथी : ३५०
  • महिला विद्याथी : १८
  • परदेशी विद्याथी : २१
  • बी.ए. : ५९
  • बी.एस्सी. : ६५
  • बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) : ११२
  • बी.टेक. : ११४
मोठी बातमी! वीर धरणातील ‘इतका’ टक्के पाणीसाठा शिल्लक; तर निरा प्रणालीत…

Web Title: Dr kiran bedi attends 150th course convocation ceremony at nda khadakwasla pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • NDA
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

बारामती बसस्थानकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात मारली बाजी
1

बारामती बसस्थानकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात मारली बाजी

“सुसंस्कृत महाराष्ट्राची ‘उडता महाराष्ट्र’ कडे वाटचाल,” पुणे विषारी दारू प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान!
2

“सुसंस्कृत महाराष्ट्राची ‘उडता महाराष्ट्र’ कडे वाटचाल,” पुणे विषारी दारू प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान!

Pune Toxic Liquor Tragedy: मुख्य सूत्रधारांसह ४ आरोपींना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; ‘मिथेनॉल’च्या वापरामुळे १८ जणांचा बळी
3

Pune Toxic Liquor Tragedy: मुख्य सूत्रधारांसह ४ आरोपींना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; ‘मिथेनॉल’च्या वापरामुळे १८ जणांचा बळी

PCMC Toxic Liquor Case: दारूत मिसळलेला ‘तो’ एक रासायनिक पदार्थ…; ज्याने घेतले 8 जणांचे बळी
4

PCMC Toxic Liquor Case: दारूत मिसळलेला ‘तो’ एक रासायनिक पदार्थ…; ज्याने घेतले 8 जणांचे बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.