Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणावळा अत्याचार प्रकरणाची निलम गोऱ्हेंनी घेतली दखल; प्रशासनाला दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

मावळ तालुक्यातील जवन (पवना डॅम) येथे ऑगस्ट २०२४ मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात दिनांक ५ मे रोजी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 10, 2026 | 02:26 PM
लोणावळा अत्याचार प्रकरणाची निलम गोऱ्हेंनी घेतली दखल; प्रशासनाला दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

लोणावळा अत्याचार प्रकरणाची निलम गोऱ्हेंनी घेतली दखल; प्रशासनाला दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील जवन (पवना डॅम) येथे ऑगस्ट २०२४ मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात दिनांक ५ मे रोजी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज लोणावळा येथे वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

 

बैठकीनंतर डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, “पीडित मुलीचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सर्व मदत केली जाईल. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तिला मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.”

पीडितेच्या सुरक्षेवर विशेष भर

पोक्सो प्रकरणात पीडितेच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. “महिला दक्षता समितीसोबत अनौपचारिक महिला कोअर टीम तयार करावी, ज्यात महिला लोकप्रतिनिधींचा समावेश असेल. यामुळे महिलांवरील अत्याचारांची माहिती तातडीने मिळू शकेल,” असे त्यांनी सांगितले.

तसेच, या तालुक्यातील २५ हजार लाडक्या बहिणींना या टीममध्ये सामील करून त्यांना सुरक्षेच्या बाबतीत जबाबदारी देण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भरोसा सेल आणि वन स्टॉप क्रायसिस सेंटरने पीडित मुलीची भेट घेऊन तिच्या समुपदेशनाची व्यवस्था केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याखेरीज, बालसंगोपन योजनेचा लाभ पीडितेला द्यावा. समुपदेशन MSW (मास्टर ऑफ सोशल वर्क) पदवीधर महिलांकडून करावे. आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबनासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

डॉ. गोऱ्हे यांनी यापूर्वी विसापूर येथील घटना व रस्त्यातून मुलीला उचलून नेण्याच्या प्रकरणाचा आढावा घेतला. या दोन्ही प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल झाले असून लवकरच कोर्टात खटला उभा राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीला, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे, चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर नेहा ठाकूर, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे आदी अधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : सुरक्षा रक्षकाकडून चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; 7 व्या मजल्यावर घेऊन गेला अन्…

Web Title: Dr neelam gorhe held a meeting with senior administrative and police officers in lonavala today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • dr. Neelam Gorhe
  • Eknath Shinde
  • maval news

संबंधित बातम्या

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
1

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
2

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका
3

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा
4

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.