Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन; वयाच्या ६२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr. Shripad Dhekane Passed Away : डॉ. श्रीपाद ढेकणे (६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून, विद्यार्थी चळवळ, अध्यापन आणि शिक्षण धोरणाच्या क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 29, 2026 | 07:54 PM
Dr. Shripad Dhekane Passed Away

Dr. Shripad Dhekane Passed Away

Follow Us
Follow Us:
  • डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन
  • विद्यार्थी चळवळीपासून शिक्षण धोरणापर्यंत योगदान
  • शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका
पुणे: शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी डॉ. श्रीपाद ढेकणे (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. विद्यार्थी चळवळ, अध्यापन, राजकीय-संघटनात्मक कार्य आणि राज्याच्या शिक्षणविषयक धोरण प्रक्रियेत त्यांनी दीर्घकाळ काम केले.ढेकणे यांनी १९८३ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. विद्यार्थी कार्यकर्ता, भागप्रमुख आणि महाविद्यालय प्रमुख अशा जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ते परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. पुणे ग्रामीण जिल्हा विस्तारक, सोलापूर जिल्हा संघटनमंत्री, शिवाजी विद्यापीठ संघटनमंत्री तसेच कोकण आणि गोवा संघटनमंत्री म्हणून त्यांनी काम केले. शहर कार्यकारिणीपासून प्रांत आणि केंद्रीय कार्यकारिणीपर्यंत एक दशकाहून अधिक काळ त्यांनी विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या.

Washim News: कर्जमुक्तीचा दुसरा टप्पा; तब्बल १७ हजार शेतकऱ्यांना मिळाला १५० कोटींचा लाभ, ७, ४०४ आधार प्रमाणीकरण बाकी

पूर्णवेळ कार्यानंतर ढेकणे खडकी येथील टी. जे. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. अध्यापन करतानाही त्यांचा विद्यार्थी चळवळीशी संपर्क कायम राहिला. अभाविपच्या पुणे शाखेचे प्रमुख म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. भारतीय मजदूर संघाशी संबंधित श्रम सेवा न्यासाच्या ‘विमर्श’ या नियतकालिकाच्या संपादकीय मंडळातही ते कार्यरत होते.ढेकणे यांनी प्राध्यापकी करत असतानाच पीएच.डी. पूर्ण केली. महानगरपालिकांच्या अंदाजपत्रकांचा तौलनिक अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पुणे शाखेचे प्रवक्ते म्हणूनही काम केले. लोकसभा, विधानसभा आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये त्यांनी विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या.

राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात ढेकणे शिक्षण मंत्रालयात विशेष अधिकारी म्हणून कार्यरत होते. विद्यापीठ कायद्यातील बदल, खासगी विद्यापीठ कायदा तसेच शालेय शिक्षण, ग्रंथालये आणि प्राथमिक शिक्षकांशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी काम केले.

पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. या काळात त्यांचा शिक्षणविषयक कामकाजावर विशेष भर होता. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात शालेय स्तरावर अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बालभारती, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यात समन्वय साधण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि शिक्षण विभागातील विविध यंत्रणांशी समन्वय साधत राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसह शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर ते अखेरपर्यंत कार्यरत होते.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक जावई, नातवंडे असा परिवार आहे.

‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ हायकोर्टाचा FDA ला सवाल; मुंबई क्रिकेट असोसिएशनला मोठा दिलासा

Web Title: Dr shripad dhekane passed away pune education sector news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • ABVP
  • Education Department
  • Maharashtra. Pune

संबंधित बातम्या

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय
1

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…
2

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…

‘… तर मराठी शाळा बंद पडल्या नसत्या’; न्यायमूर्ती प्रसन्न वराळेंचे सरकारला खडेबोल
3

‘… तर मराठी शाळा बंद पडल्या नसत्या’; न्यायमूर्ती प्रसन्न वराळेंचे सरकारला खडेबोल

Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल!; एकनाथ शिंदेंचे मोठे आवाहन
4

Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल!; एकनाथ शिंदेंचे मोठे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.