Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : कोट्यवधींचा खर्च करुन शाळांमध्ये बसवलेली ‘ई-लर्निंग’ यंत्रणा ठप्प; नेमके कारण येईना लक्षात

राज्यातील शाळांमध्ये ई लर्निंग सुविधा सुरु करण्यात आले आहेत. मात्र या सुविधा धुळ खात पडले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. केवळ इंटरनेट सेवा बंद असल्याने ई-लर्निंग बंद आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 01, 2025 | 03:22 PM
e-learning system installed in pune schools shut down pmc news

e-learning system installed in pune schools shut down pmc news

Follow Us
Follow Us:

पुणे : काेट्यवधी रुपये खर्च करून महापािलकेच्या शाळांमध्ये ई लर्निंग यंत्रणा सुरु करण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षापासून ई लर्निंग यंत्रणा बंद झाली आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी दुजाेरा दिला असुन, ही यंत्रणा बंद असण्यामागील कारण माहिती नसल्याचे त्यांनी नमूद केले.

पुणे महापािलकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी 2017 साली ई-लर्निंग यंत्रणा महापािलकेच्या शिक्षण मंडळांच्या शाळांत उपलब्ध करूनदिली गेली. यासाठी सुमारे 20 कोटी 99 लाख रुपये खर्च केले गेले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सत्र, तसेच विविध विषयांवरील माहीती देण्यासाठी लाखो रुपये करुन आकाशवाणीच्या धर्तीवर स्टुडिओ देखिल उभारला आहे. मात्र ही यंत्रणाच बंद पडल्याने स्टुडिओसह सर्व यंत्रणा धूळखात पडून आहे. इंटरनेटची सुविधाच नसल्याने ही यंत्रणा बंद पडल्याचे प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

रिलायन्सच्या जिओ कंपनीने देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिकांच्या शाळांना मोफत इंटरनेट सेवा देण्याची घोषणा केली होती. महापालिका प्रशासनाने या सेवेसाठी पाठपुरावा करुन शाळांमध्ये ई-लर्निंग शिक्षण देण्यासाठी इंटरनेट जोडून घेतले होते. त्यानुसार शहरातील विविध माध्यमांच्या २६५ शाळांमध्ये ई- लर्निंग सुरु झाले होते.

विद्या निकेतन, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, क्रीडा निकेतन, संगीत विद्यालय यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असलेल्या ई- लर्निंगसाठी प्रयत्न करण्यात आले होते. गेल्या सात ते आठ वर्षांपासून ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले गेले. प्रत्येक इयत्तेनुसार अभ्यासक्रमाची सॉफ्टवेअर तयार करण्यात आली. 265 शाळांतील वर्गखोल्यांमध्ये टीव्ही संच (स्क्रीन), तसेच शाळांसाठी संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सुरवातीला बीएसएनएल या शासकीय कंपनीकडून सेवा घेण्यात आली. कोरोनामध्ये शाळा बंद राहिल्याने ही सेवा काहीशी विस्कळीत झाली होती. मात्र त्यानतंर याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. केवळ इंटरनेट सेवा बंद असल्याने ई-लर्निंग बंद असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

इंटरनेट नसल्याने यंत्रणेवर धुळ

बीएसएनएल पालिकेला इंटरनेट सेवा देण्यास असमर्थ ठरली आहे. रिलायन्स कंपनीने देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मोफत इंटरनेट सेवा देण्याचे जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत रिलायन्स कंपनीच्या जिओ इंटरनेटसाठी पाठपुरावा केला जातो. मात्र त्यानंतर ही जिओचे इंटरनेट महापालिकेला घेता आलेले नाही. केवळ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही यंत्रणा धूळखात पडून आहे.

महाराष्ट्रसंंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

याबाबत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन म्हणाले की, ‘‘महापालिकेतील विविध विभागांचा आढावा घेतला. महापालिकेच्या शाळांमध्ये सुरु केलेली ई-लर्निंग यंत्रणेबाबत चर्चा झाली. ही यंत्रणा बंद असल्याची माहिती विभाग प्रमुखांनी दिली. परंतु ही यंत्रणा का बंद आहे, याचे कारण त्यांनी सांगितले नाही. तसेच मलाही माहिती नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षात ही यंत्रणा पुन्हा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’’ असे मत चंद्रन यांनी आणले आहे.

Web Title: E learning system installed in pune schools shut down pmc news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • Education System In India
  • Pune Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार
1

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
2

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
3

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
4

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.