महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती झाल्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. राजकीय नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन ध्वजारोहन केले आहे. सोशल मीडियावर नेत्यांनी याचे खास फोटो शेअर केले आहेत.
Political leaders hoisted the flag and saluted on the occasion of Maharashtra Day 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री शिवाजीनगरच्या पोलीस संचलन मैदान येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांच्या त्यागाचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त ठाण्यातील साकेत पोलीस मैदान येथे उपस्थित राहून ध्वजवंदन केले.
खासदार सुप्रिया सुळे यांन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक, मुंबई येथील स्मारकास महाराष्ट्र अभिवादन केले.
महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त पोलिस संचलन मैदान, नाशिक येथे शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रदिनानिमित्त कस्तुरचंद पार्क, नागपूर येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहन केले. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मंत्री भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त सांगली पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.