Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक आयोगाला आली जाग! महापालिकेतील गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जि. प. निवडणुकांसाठी १४ हजार EVM

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्रे असून, यासाठी तब्बल १४ हजारांहून अधिक मतदानयंत्रे आणि ५ हजार ८१३ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 25, 2026 | 05:30 PM
Pune administration ready with 14 thousand EVMs for Zilla Parishad and Panchayat Samiti elections

Pune administration ready with 14 thousand EVMs for Zilla Parishad and Panchayat Samiti elections

Follow Us
Follow Us:

District Council Election : पुणे शहर : आकाश ढुमे पाटील : मागील नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांदरम्यान (Pune News) अनेक ठिकाणी मतदानयंत्रे आणि कंट्रोल युनिट बंद पडल्याने मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. या अनुभवातून धडा घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदानयंत्रांची उपलब्धता थेट चारपटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. (Political News)

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्रे असून, यासाठी तब्बल १४ हजारांहून अधिक मतदानयंत्रे आणि ५ हजार ८१३ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकीदरम्यान ईव्हीएम आणि कंट्रोल युनिट बंद पडल्याच्या शेकडो घटना घडल्या होत्या. अनेक मतदान केंद्रांवर अर्धा तास ते तासभर मतदान थांबले होते. तातडीने पर्यायी यंत्रे उपलब्ध न झाल्याने मतदारांच्या लांब रांगा लागल्या आणि सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू राहिले होते. या पार्श्वभूमीवर, यंदा कोणत्याही परिस्थितीत मतदान प्रक्रिया खोळंबू नये, यासाठी अतिरिक्त यंत्रांचा साठा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे देखील वाचा : कोल्हापूरमध्ये बंडखोरीचा भडका; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षीय नेतृत्वासमोर आव्हान

नादुरुस्त यंत्रे भोसरी गोदामात सीलबंद

महापालिका निवडणुकीत बंद पडलेल्या १,१९२ मतदानयंत्रे आणि ८१२ कंट्रोल युनिट सध्या जिल्हा प्रशासनाच्या भोसरी येथील गोदामात सीलबंद अवस्थेत ठेवण्यात आली आहेत.

इंदापूरमध्ये सर्वाधिक, वेल्ह्यात सर्वांत कमी मतदान केंद्रे

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यात सर्वाधिक ४०० मतदान केंद्रे असून, तेथे १,६६४ मतदानयंत्रे आणि ६६० कंट्रोल युनिट देण्यात आली आहेत. तर वेल्हा तालुक्यात सर्वांत कमी १०५ मतदान केंद्रे असून, तेथे ४३७ मतदानयंत्रे आणि १७३ कंट्रोल युनिट उपलब्ध असणार आहेत. उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी सांगितले की, “महापालिका निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन, यंत्रे बंद पडल्यास तात्काळ बदल करता यावा, यासाठी मतदानयंत्रांची उपलब्धता चारपटीने वाढविण्यात आली आहे.

हे देखील वाचा : देशातील 45 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील चार भूमिपुत्रांचा समावेश, वाचा संपूर्ण यादी

अर्जमाघारीसाठी केवळ दोनच दिवस

दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेसाठी १० आणि पंचायत समितीसाठी १२ उमेदवारांनी माघार घेतली आहे. २७ जानेवारी हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र २५ आणि २६ जानेवारी या सार्वजनिक सुट्ट्या असल्याने उमेदवारांना प्रत्यक्षात केवळ २४ आणि २७ जानेवारी असे दोनच दिवस उपलब्ध असणार आहेत. दौंड तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ७ गणांसाठी दाखल ९५ अर्जांपैकी ४ अर्ज माघारी घेण्यात आले आहेत. पंचायत समितीसाठी दौंडमधून ६, इंदापूरमधून ३, तर शिरूर, खेड आणि वेल्हा तालुक्यांतून प्रत्येकी एका उमेदवाराने माघार घेतली आहे. अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषदेसाठी ६११ आणि पंचायत समितीसाठी १,११० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अंतिम चित्र २७ जानेवारीनंतर स्पष्ट होणार असून, त्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: Ec ready with 14 thousand evms for pune zilla parishad and panchayat samiti elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • EVM Machine
  • pune news
  • Pune Politics

संबंधित बातम्या

पुण्यात दोन वर्षांत धावल्या अवघ्या १७ ‘पिंक ई-ऑटो’; अनुदान दुप्पट, मात्र…
1

पुण्यात दोन वर्षांत धावल्या अवघ्या १७ ‘पिंक ई-ऑटो’; अनुदान दुप्पट, मात्र…

पुणे महापालिकेत बोगस भरतीचे रॅकेट, कंत्राटी कामगारांना कायम करा; मनसेची मागणी
2

पुणे महापालिकेत बोगस भरतीचे रॅकेट, कंत्राटी कामगारांना कायम करा; मनसेची मागणी

DSP Trophy Cricket: पुणेरी स्ट्रायकर्स आणि फिअरलेस फायटर्सची विजयी घौडदौड
3

DSP Trophy Cricket: पुणेरी स्ट्रायकर्स आणि फिअरलेस फायटर्सची विजयी घौडदौड

Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंच्या ‘त्या’ निर्णयावर पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया
4

Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंच्या ‘त्या’ निर्णयावर पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.