Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीत वर्चस्ववादासाठी रस्सीखेच; भाजपा, राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडून मतदारसंघ मिळवण्यासाठी हालचाली

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीमधील भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या दोन्ही पक्षातील इच्छुकांनी हा मतदारसंघ आपल्या वाट्याला यावा, अशी मागणी पक्षाच्या नेतृत्वाकडे केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 24, 2026 | 12:21 PM
महायुतीत वर्चस्ववादासाठी रस्सीखेच; भाजपा, राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडून मतदारसंघ मिळवण्यासाठी हालचाली

महायुतीत वर्चस्ववादासाठी रस्सीखेच; भाजपा, राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडून मतदारसंघ मिळवण्यासाठी हालचाली

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीमधील भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या दोन्ही पक्षातील इच्छुकांनी हा मतदारसंघ आपल्या वाट्याला यावा, अशी मागणी पक्षाच्या नेतृत्वाकडे केली आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची बैठक पार पडली. या बैठकीतही मतदारसंघ हा आपलाच होता, तो आपल्याला मिळावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून पवार यांच्याकडे केली गेली.

 

गेल्या आठवड्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तेव्हापासून पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेचा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. २०१६ साली निवडणूक झाली. तेव्हा अनिल भोसले हे विजयी झाले होते. त्यांनी भाजपाचे अशोक येनपुरे यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे येनपुरे यांनी भाजपाची कमी असतानाही शंभराहून अधिक मते मिळविली होती. गेल्या काही वर्षांत पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. विशेषत: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. त्याचवेळी भाजपाने पुणे, पिपंरी चिंचवड महापालिकेत तसेच काही नगर पालिका, नगरपंचायतीमध्ये सत्ता मिळविली आहे.

दौंड, इंदापूर, भोर येथील काही स्थानिक आघाड्यांचे लोकप्रतिनिधीही भाजपासोबत आहेत. या पार्श्वभुमीवर भाजपाचे या मतदारसंघात सव्वा तीनशेहून अधिक मते आहेत. भाजपाकडून पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ मिळावा. यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भाजपाकडून पुणे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर, पुणे बुक फेस्टीवलचे आयोजन करणारे आणि भाजपाचे प्रदेश पदाधिकारी राजेश पांडे, माजी आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे. इच्छुकांकडून पक्षाच्या नेत्यांकडे हा मतदारसंघ भाजपाला मिळावा. यासाठी मनधरणी केली जात आहे.

अर्ज दाखल करण्यास सुरुवात

यापूर्वी हा मतदारसंघ आपणच जिंकला आहे. तो आपल्या वाट्यालाच यावा, अशी भुमिका इच्छुकांकडून घेतली गेली आहे. दोन्ही पक्षाकडून या मतदारसंघासाठी आता रस्सीखेच सुरु झाली आहे. २५ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. तत्पुर्वी हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार याविषयी महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील.

हे सुद्धा वाचा : युवकांना झुरळ म्हणणे म्हणजे युवाशक्तीचा अपमान, गैरसमज पसरवत ‘कॉक्रोच पार्टी’वर बंदी; विश्वजीत कदम यांचा आरोप

भाजपा मतदारसंघ हातातून सोडणार नाही

भाजपाची पुणे जिल्ह्यातील वाढलेली ताकद पाहता भाजपा हा मतदारसंघ आपल्या हातातून जाऊन देणार नाही, हे मात्र निश्चित मानले जात आहे. यापूर्वी झालेल्या प्राथमिक चर्चेत पुणे हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. महाविकास आघाडीची मते कमी असल्याने त्यांच्याकडून या जागेसाठी कोण उमेदवार असेल हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Efforts are underway by bjp and ncp workers to get candidature in pune constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Sunetra ajit Pawar

संबंधित बातम्या

Pune Cricket: स्पार्टन मान्सून लीग T-20: लेजंड्स स्पोर्ट्स क्लब अन् कल्याण क्लबची विजयी मालिका सुरूच
1

Pune Cricket: स्पार्टन मान्सून लीग T-20: लेजंड्स स्पोर्ट्स क्लब अन् कल्याण क्लबची विजयी मालिका सुरूच

Sports News: निर्णायक थरार! ‘सुप्रीम एसेस’ने राखले वर्चस्व; PYC Snooker League ची ट्रॉफी पुन्हा उंचावली
2

Sports News: निर्णायक थरार! ‘सुप्रीम एसेस’ने राखले वर्चस्व; PYC Snooker League ची ट्रॉफी पुन्हा उंचावली

Mhada Pune: स्वप्नातले घर आता सत्यात येणार! म्हाडाच्या लॉटरीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
3

Mhada Pune: स्वप्नातले घर आता सत्यात येणार! म्हाडाच्या लॉटरीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Pune Accident : सिंहगड रस्त्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू; पीएमपी बसमधून पडली अन् थेट…
4

Pune Accident : सिंहगड रस्त्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू; पीएमपी बसमधून पडली अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.