Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांनो ट्रेकिंगला जाताय? सिंहगड, लोणावळ्यासह घाटमाथ्यावर हाय-अलर्ट; वन विभागाकडून ‘हा’ महत्त्वाचे आवाहन

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, अपघात, मार्ग चुकणे, वनाग्नी किंवा वन्यप्राणी संबंधित घटना घडल्यास १९२६ या टोल-फ्री हेल्पलाईनवर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 07, 2026 | 02:35 AM
पुणेकरांनो ट्रेकिंगला जाताय? सिंहगड, लोणावळ्यासह घाटमाथ्यावर हाय-अलर्ट; वन विभागाकडून ‘हा’ महत्त्वाचे आवाहन
Follow Us
Follow Us:
  • पुणे वन विभागाचे पर्यटकांना आवाहन
  • मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता
  • आपत्कालीन परिस्थिती हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन 
सुनयना सोनवणे /पुणे: पावसाळा सुरू झाला की पुणे परिसरातील किल्ले, घाटमाथे आणि धबधबे पर्यटकांनी गजबजून जातात. सिंहगड, राजगड आणि लोणावळा परिसरासह वन विभागाच्या अखत्यारीतील विविध ठिकाणी या दिवसांत पर्यटकांची मोठी वर्दळ दिसते. मात्र, निसर्गसौंदर्य जितके आकर्षक तितकेच काही ठिकाणी धोकेही वाढले असल्याचा इशारा पुणे वन विभागाने दिला आहे.

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, दगड घसरणे, झाडांच्या फांद्या तुटणे तसेच धबधबे, ओढे आणि नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांनी अधिक सतर्क राहूनच पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामानात क्षणाक्षणाला होणारे बदल लक्षात घेता काही मिनिटांतच पाण्याचा प्रवाह धोकादायक पातळीवर जाऊ शकतो, असेही वन विभागाने स्पष्ट केले आहे.

पुण्यावर घोंघावतंय भयंकर संकट; सावधान! Khadakwasla Dam मधून कोणत्याही क्षणी…, नागरिकांना आवाहन

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, अपघात, मार्ग चुकणे, वनाग्नी किंवा वन्यप्राणी संबंधित घटना घडल्यास १९२६ या टोल-फ्री हेल्पलाईनवर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

पुणे वन विभागाच्या मार्गदर्शक सूचना –
* धबधबे, ओढे, नाले व वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरू नये.
* दरडप्रवण, घसरडे व कड्यालगतचे धोकादायक भाग टाळावेत.
* धबधब्यांच्या माथ्यावर किंवा प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करू नये.
* सेल्फी किंवा छायाचित्रणासाठी जीव धोक्यात घालू नये.
* अतिवृष्टी, दाट धुके किंवा विजांचा कडकडाट असल्यास पर्यटन टाळावे.
* वन विभागाचे इशारा फलक व कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे.
* मद्यपान करून पर्यटनस्थळी वावरू नये.
* लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावे.
* वनक्षेत्रात कचरा टाकू नये व पर्यावरणास हानी पोहोचवू नये.
* वन्यजीवांना त्रास होईल असे वर्तन टाळावे.
* आपत्कालीन परिस्थितीत १९२६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

Ashadhi Wari 2026: वारकऱ्यांनो आळंदीत येऊ नका! इंद्रायणीला महापूर, देवस्थानचे आवाहन

‘पावसाळा हा निसर्गाचा उत्सव आहे. पर्यटकांनी निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा; मात्र स्वतःची सुरक्षितता, वनक्षेत्रातील नियम आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी यांचे भान ठेवून जबाबदार पर्यटनाला प्राधान्य द्यावे.’
-अभिजित वायकोस, उपवनसंरक्षक, पुणे

खडकवासला धरण 32 टक्के भरले 

पावसाचा जोर अशाच पद्धतीने राहिल्यास धरण 80 टक्के भरले जाऊ शकते. त्यामुळे तसे झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे. पुणेकरांना खडकवासला धरण 32 टक्के भरल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Forest department appeal top trekkers and peoples lonnavala sinhgad due to heavy rainfall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Forest Department
  • Heavy Rainfall
  • pune news
  • Trekking

संबंधित बातम्या

हाहा:कार! वाई तालुक्यात अतिवृष्टी; मुसळधार पावसामुळे पूल पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला
1

हाहा:कार! वाई तालुक्यात अतिवृष्टी; मुसळधार पावसामुळे पूल पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला

पुणे पोलिसांचा कडक आदेश; नेमप्लेट लपविणाऱ्या पोलिसांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई
2

पुणे पोलिसांचा कडक आदेश; नेमप्लेट लपविणाऱ्या पोलिसांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई

पुण्यात आता चालणंही झालं अवघड; पादचाऱ्याच्या डोक्यात दगड मारुन रोकड नेली पळवून
3

पुण्यात आता चालणंही झालं अवघड; पादचाऱ्याच्या डोक्यात दगड मारुन रोकड नेली पळवून

Pune News: पुण्यात FDAची मोठी कारवाई! ‘मथुरा प्युअर व्हेज’ बंद; 7 नामांकित रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित
4

Pune News: पुण्यात FDAची मोठी कारवाई! ‘मथुरा प्युअर व्हेज’ बंद; 7 नामांकित रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.