संग्रहित फोटो
पिंपरी : सलग दोन वेळा सीए परीक्षेत अपयश आल्यानंतर तरुणीने तिसऱ्यांदा परीक्षा दिली. मात्र, तिसऱ्या वेळी देखील अपयश आल्याने तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Pimpri) केली. ही घटना शुक्रवारी (दि. 11) सकाळी केशवनगर, चिंचवड येथे घडली. पल्लवी संजय जाधव (वय 24, रा. केशवनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी सनदी लेखापाल (सीए) होण्यासाठी अभ्यास करत होती. तिने यापूर्वी दोन वेळा सीएची परीक्षा दिली. मात्र, दोन्ही वेळेला तिला अपयश आले. मागील वेळी तिने तिसऱ्यांदा सीएची परीक्षा दिली. त्याचा निकाल नुकताच लागला आहे. मात्र, यावेळी देखील पल्लवी अपयशी ठरली. निकाल ऐकल्यापासून ती घरात कोणाशीच बोलत नव्हती.
दरम्यान, आज सकाळी पल्लवीने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. परीक्षेत आलेल्या अपयशामुळे पल्लवीने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.