Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर उद्योग आर्थिक संकटात, सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात; हर्षवर्धन पाटलांची मागणी

साखर उद्योगास दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 01, 2026 | 02:02 PM
साखर उद्योग आर्थिक संकटात, सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात; हर्षवर्धन पाटलांची मागणी

साखर उद्योग आर्थिक संकटात, सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात; हर्षवर्धन पाटलांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • साखर उद्योग आर्थिक संकटात
  • सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात
  • हर्षवर्धन पाटलांची मागणी
पुणे : राज्यातील साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटातून जात असून, शेतकऱ्यांची थकबाकी आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. चालू गळीत हंगामातील सुमारे ४ हजार ६०० कोटी रुपयांची थकबाकी उस उत्पादक शेतकऱ्यांना देय असून, ही रक्कम आता ५ हजार कोटींच्या पुढे गेली आहे. या पार्श्वभूमीवर साखर उद्योगास दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

 

यासंदर्भात बुधवारी (दि. ४) मुंबई येथे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस साखर उद्योगाशी संबंधित विविध खात्यांचे मंत्री उपस्थित राहणार असून, उद्योगास दिलासा देणारे निर्णय अपेक्षित असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याची मागणी

जलसंपदा विभागाने साखर कारखान्यांसाठी पाणीपट्टी दरात मोठी वाढ केली आहे. नव्या दरांनुसार प्रति घनमीटर पाणी वापरासाठी कारखान्यांना जादा रक्कम मोजावी लागत आहे. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगावर यामुळे अतिरिक्त भार पडत असून, साखर उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढीव पाणीपट्टी तातडीने रद्द करावी, अशी ठाम भूमिका पाटील यांनी मांडली.

थकबाकी, सॉफ्ट लोन आणि निर्यात अनुदानाची गरज

दिनांक १५ फेब्रुवारीअखेर राज्यातील १५७ साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना सुमारे ४६०१ कोटी रुपये देय होते. ही रक्कम आता ५ हजार कोटींच्या पुढे गेल्याचे सांगत पाटील यांनी कारखान्यांना सॉफ्ट लोन देण्याची मागणी केली आहे. तसेच उसाच्या किमान विक्री किमतीत (एमएसपी) वाढ करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, साखर निर्यातीसाठी अनुदान द्यावे आणि इथेनॉलच्या दरवाढीसाठीही तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ऑइल कंपन्यांनी खरेदी करणाऱ्या इथेनॉलपैकी किमान ५० टक्के इथेनॉल साखर उद्योगांकडून घेण्याची अट घालावी, गाळप झालेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये अनुदान द्यावे, तसेच सह-वीजनिर्मिती प्रकल्पांतून महावितरणला विकल्या जाणाऱ्या विजेसाठी प्रति युनिट १.५० रुपये अनुदान पुढेही सुरू ठेवावे, अशा विविध मागण्या शासनासमोर मांडण्यात आल्या आहेत.

प्रदूषण मंडळाच्या त्रासावरही चर्चा

राज्य शासनाच्या अखत्यारीतील प्रदूषण नियामक मंडळाकडून साखर कारखान्यांना वारंवार नाहक त्रास दिला जात असल्याची तक्रार उद्योग क्षेत्रातून होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी होणाऱ्या बैठकीत या मुद्द्यावरही चर्चा होऊन कारखान्यांना दिलासा देणारा निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच बँकांकडील कर्जाचे पुनर्गठण, आगामी २०२६-२७ गळीत हंगामासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी विशेष सॉफ्ट लोन योजना राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Web Title: Harshvardhan patil has demanded that the government urgently resolve the problems facing the sugar industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Farmers
  • Harshvardhan Patil
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रशासनाला निर्देश
1

नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रशासनाला निर्देश

कर्जवसुली नको, कर्जमाफी हवी! शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवार आक्रमक; १२ जूनपासून पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन
2

कर्जवसुली नको, कर्जमाफी हवी! शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवार आक्रमक; १२ जूनपासून पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Satara News: प्रतापगड १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल जमा करणार :सौरभ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
3

Satara News: प्रतापगड १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल जमा करणार :सौरभ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला; जुन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड
4

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला; जुन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.