Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पूरपरिस्थिती, 1500 नागरिकांची सुटका; तर तब्बल…

अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत सुमारे १,५०० नागरिकांची बोटींच्या सहाय्याने सुखरूप सुटका केली असून, ५,००० हून अधिक पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 07, 2026 | 03:07 PM
अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पूरपरिस्थिती, 1500 नागरिकांची सुटका; तर तब्बल...

अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पूरपरिस्थिती, 1500 नागरिकांची सुटका; तर तब्बल...

Follow Us
Follow Us:

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहराला झोडपून काढणाऱ्या मुसळधार अतिवृष्टीमुळे थेरगाव, चिंचवडसह शहराच्या विविध भागांत भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी अहोरात्र युद्धपातळीवर बचावकार्य राबवले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत सुमारे १,५०० नागरिकांची बोटींच्या सहाय्याने सुखरूप सुटका केली असून, ५,००० हून अधिक पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

 

२५ हून अधिक भागांना पुराचा वेढा

अतिवृष्टीमुळे रहाटणी, केशवनगर, ताथवडे, किवळे, रावेत, मोशी, चिखली, रमाबाई नगर, भाट नगर, आंबेडकर नगर, नढे नगर, पिंपळे गुरव, नवी सांगवी आणि भोसरीतील कुंदननगर यांसह सुमारे २० ते २५ सखल भागांमध्ये पुराचे पाणी शिरले. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या पूरग्रस्त भागांतून बाधित झालेल्या ५,००० नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये हलविण्यात आले आहे. तेथे प्रशासनातर्फे भोजन, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत.

‘गुरुकुलम’मधील ३०० मुले आणि २०० गायींची सुरक्षित सुटका

चिंचवडगाव येथील पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’मध्ये पुराचे पाणी वेगाने वाढल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मनपा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी तातडीने यंत्रणेसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने गुरुकुलममधील तब्बल ३०० विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षित निवारा केंद्रात हलवले.

केवळ मानवी जीवच नव्हे, तर मुक्या जनावरांच्या सुरक्षेसाठीही प्रशासनाने मोठे पाऊल उचलले. गुरुकुलच्या गोठ्यात पाणी शिरल्याने अडकलेल्या २०० हून अधिक गायींसह शहरातील एकूण ७५० जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या संवेदनशील कामगिरीबद्दल पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी सभापती व प्रशासनाचे कौतुक केले.

हे सुद्धा वाचा : ‘१२ वर्षांपूर्वी मंत्रालये एकमेकांपासून वेगळी चालायची, पीएम मोदींनी…’, नवभारत कॉन्क्लेव्हमध्ये अनुप्रिया पटेल यांचे मोठे विधान

‘या’ कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी

महापालिकेच्या सर्व १० अग्निशमन केंद्रांतील जनावानी परस्पर समन्वयाने ही मोहीम फत्ते केली. यामध्ये उप अग्निशमन अधिकारी अनिल टिंबळे, दिलीप गायकवाड, सुनील फरांदे, श्रीकांत वैरागर, गौतम इंगवले, चंद्रशेखर घुले यांच्यासह लिडिंग फायरमन अनिल कदम, वरिष्ठ फायरमन चेतन माने आणि जवान सुमित कांबळे, शुभम किरवे, दर्शन सोनवणे, संतोष सरोटे, नामदेव वाघे, ड्रायव्हर-ऑपरेटर अमोल चिपळुनकर यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. तर नियंत्रण कक्षात २४ तास तैनात राहून पूजा वलगुडे, करूणा थोया, तेजस्वी पाटील आणि स्नेहा जगताप यांनी आपत्कालीन कॉल्सचे चोख व्यवस्थापन सांभाळले. सध्याही शहरात बचावकार्य अविरत सुरू आहे.

Web Title: Heavy rain has been falling in pimpri chinchwad city for the past few days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • Rain News

संबंधित बातम्या

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
1

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
2

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

Asian Games 2026: महाराष्ट्राच्या वाघिणीने चीनला उभा फाडला! प्रिथिकाने तिरंदाजीत पटकावले ‘सुवर्ण’
3

Asian Games 2026: महाराष्ट्राच्या वाघिणीने चीनला उभा फाडला! प्रिथिकाने तिरंदाजीत पटकावले ‘सुवर्ण’

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
4

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.