Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rain Alert: पुण्याचा नाद नाही करायचा! जुलैमध्ये पावसाची विक्रमी नोंद; तब्बल 119 वर्षांनंतर….

यंदाच्या जुलै महिन्याच्या पहिल्याच दहा दिवसांत पुण्याने सरासरी मासिक पावसाचा टप्पा पार केला होता. त्यानंतर संपूर्ण महिनाभर सक्रिय राहिलेल्या मान्सूनमुळे शहरात वारंवार मुसळधार पाऊस झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 29, 2026 | 06:49 PM
Rain Alert: पुण्याचा नाद नाही करायचा! जुलैमध्ये पावसाची विक्रमी नोंद; तब्बल 119 वर्षांनंतर….
Follow Us
Follow Us:

पुणे शहरात जुलैमध्ये विक्रमी पावसाची नोंद
तब्बल ११९ वर्षांनंतर पुण्यात सर्वाधिक पाऊस
जुलैअखेरपर्यंत पावसाची शक्यता कायम

सुनयना सोनवणे/ पुणे: पुणे शहराने यंदाच्या जुलैमध्ये विक्रमी पावसाची नोंद करत ११९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) शिवाजीनगर वेधशाळेच्या नोंदीनुसार, बुधवारी (ता. २९)सकाळपर्यंत जुलै महिन्यात ५०८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९०७ मध्ये ५०८.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे तब्बल ११९ वर्षांनंतर पुण्यात जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

याआधी मंगळवारी (ता.२८) रात्री ८.३० वाजेपर्यंत ५०८.२ मिमी पावसाची नोंद झाली होती आणि पुणे अवघ्या ०.३ मिमीने विक्रमापासून दूर होते. रात्री झालेल्या पावसानंतर हा ऐतिहासिक टप्पा ओलांडला गेला. जुलैअखेरपर्यंत पावसाची शक्यता कायम असल्याने या विक्रमी पर्जन्यमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या जुलै महिन्याच्या पहिल्याच दहा दिवसांत पुण्याने सरासरी मासिक पावसाचा टप्पा पार केला होता. त्यानंतर संपूर्ण महिनाभर सक्रिय राहिलेल्या मान्सूनमुळे शहरात वारंवार मुसळधार पाऊस झाला. १ जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत शिवाजीनगर वेधशाळेत ५७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट! ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून…

हवामान विभागाच्या मते, मान्सून द्रोणी दक्षिणेकडे सरकणे, ओडिशा व लगतच्या भागातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र, उत्तर भारतातील पश्चिमी विक्षोभ तसेच विविध स्तरांवरील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह मध्य आणि पश्चिम भारतात मान्सून सक्रिय राहिला. त्यामुळे पुणे आणि परिसरात सलग पावसाच्या सरी कोसळत राहिल्या आणि जुलै २०२६ हा शहराच्या इतिहासातील सर्वाधिक पावसाचा जुलै ठरला.

दरम्यान, या विक्रमी पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात मोठी वाढ झाली असून पाणीटंचाईची चिंता दूर झाली आहे. मात्र, अनेक सखल भागांत पाणी साचणे, वाहतूक कोंडी, स्थानिक पूरस्थिती तसेच घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस पुणे आणि परिसरात हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज व्यक्त करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्राच्या दिशेने येतंय वादळी संकट; कोकण, मुंबई अन्…; अलर्टने चिंता वाढली

राज्यात जून आणि जुलै महिन्याचे सुरुवातीचे दिवस अत्यंत कोरडे गेले होते. मात्र जुलै महिन्यात पावसाने सगळी कसर भरून काढल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच आता हवामान विभागाने राज्याला पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Web Title: Heavy rain in july month of pune breaks 119 years record latest imd alert and weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • pune news
  • Pune Rain

संबंधित बातम्या

Inter-IT Football: ११-० चा धमाका! सायबेजच्या खेळाडूंचा मैदानात धुमाकूळ, डिलॉइट भुईसपाट
1

Inter-IT Football: ११-० चा धमाका! सायबेजच्या खेळाडूंचा मैदानात धुमाकूळ, डिलॉइट भुईसपाट

डोळ्यांवर स्प्रे मारून 8 लाखांची रोकड लुटली; पुण्याच्या वारजे माळवाडीतील धक्कादायक घटना
2

डोळ्यांवर स्प्रे मारून 8 लाखांची रोकड लुटली; पुण्याच्या वारजे माळवाडीतील धक्कादायक घटना

Pune ZP Budget 2026: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; ३२ कोटींची वाढ
3

Pune ZP Budget 2026: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; ३२ कोटींची वाढ

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज शाळा, कॉलेजला सुट्टी; प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
4

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज शाळा, कॉलेजला सुट्टी; प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.