Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट; काही ठिकाणी अतिवृष्टी तर घाटमाथ्यावर…, IMD चा अलर्ट काय?

सोमवारी पहाटे हलक्या सरींनी सुरुवात झाल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर अचानक वाढला. त्यानंतर सलग दोन ते तीन तास शहरातील विविध भागांत जोरदार पाऊस झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 27, 2026 | 09:28 PM
Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट; काही ठिकाणी अतिवृष्टी तर घाटमाथ्यावर…, IMD चा अलर्ट काय?
Follow Us
Follow Us:
  • पुण्यात पावसाची दमदार हजेरी
  • वाहतूक कोंडीत नागरिकांची तारांबळ
  • वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत 
पुणे/सुनयना सोनवणे: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी (ता. २७) दुपारच्या सुमारास पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने दमदार पुनरागमन केले. अवघ्या दोन-तीन तासांच्या जोरदार सरींमुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले, तर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. काही सखल भागांत पाणी साचल्याने आणि काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.

सोमवारी पहाटे हलक्या सरींनी सुरुवात झाल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर अचानक वाढला. त्यानंतर सलग दोन ते तीन तास शहरातील विविध भागांत जोरदार पाऊस झाला. कोथरूड, डेक्कन, शिवाजीनगर, सिंहगड रस्ता, बाणेर, औंध, बालेवाडी, स्वारगेट, धनकवडी, कात्रज, हडपसर, कोंढवा, बावधन, पाषाण, बिबवेवाडी, लोहगाव, विश्रांतवाडी, म्हाळुंगे, सूस रस्ता, खडकवासला, उंड्री आणि खराडी परिसरात मुसळधार सरी कोसळल्या.

मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. पाण्याखाली खड्डे झाकले गेल्याने वाहनचालकांना, विशेषतः दुचाकीस्वारांना, मोठी कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी वाहने संथ गतीने सरकल्याने प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांना नेहमीपेक्षा अधिक वेळ प्रवास करावा लागला.

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो तयार राहा! दोन दिवस पावसाची विश्रांती, पण 1 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

वायव्य बंगालच्या उपसागरात तसेच पश्चिम बंगाल-उत्तर ओडिशा किनारपट्टीलगत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्यामुळे आजपासून पुढील चार ते पाच दिवस कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील तीन दिवस अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी आणि त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस अनेक भागांत पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

पुणे शहरात सोमवारी कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मंगळवारी (ता. २८) कमाल तापमान २८ अंश, किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून, आकाश अंशतः ढगाळ राहून खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथे हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार

 पावसाची नोंद (मिमी मध्ये)
चिंचवड – १२
पाषाण – १२
शिवाजीनगर – ११.७
कोरेगाव पार्क – ११
दापोडी – ३.५
हडपसर – २.५
एनडीए – २

Web Title: Heavy rain in pune imd alert to maharashtra latest weather updates yellow alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • Heavy Rainfall
  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain News

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार
1

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार

Weather Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; अनेक भागांत यलो अलर्ट
2

Weather Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; अनेक भागांत यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.