Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपूर्ण कामांमुळे प्रवासाचे स्वप्न पुन्हा लांबणीवर! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोकडून ‘तारीख पे तारीख’

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या ‘पुणे मेट्रो मार्ग३’ प्रकल्पाची प्रवासी सेवा १५ जूनपासून सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 10, 2026 | 12:20 PM
अपूर्ण कामांमुळे प्रवासाचे स्वप्न पुन्हा लांबणीवर! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोकडून 'तारीख पे तारीख'

अपूर्ण कामांमुळे प्रवासाचे स्वप्न पुन्हा लांबणीवर! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोकडून 'तारीख पे तारीख'

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पुणेकरांच्या, विशेषतः आयटी नगरीतील लाखो नोकरदारांच्या स्वप्नपूर्तीची घटिका समीप येण्याऐवजी पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या ‘पुणे मेट्रो मार्ग३’ प्रकल्पाची प्रवासी सेवा १५ जूनपासून सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे. प्रशासकीय स्तरावर १५ जूनची तारीख दिली जात असली, तरी जमिनीवरील सत्य परिस्थिती पाहता हा मुहूर्तही हुकण्याची चिन्हे आहेत.

 

या प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’च्या (पीआयटीसीएमआरएल) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रकल्पाची आकडेवारी पाहिल्यास एक धक्कादायक वास्तव समोर येते. ८,३१३ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात मे अखेरपर्यंत ९७.४० टक्के खर्च झाला आहे; मात्र कामाची भौतिक प्रगती केवळ ९४.५८ टक्केच आहे. खर्च जवळपास पूर्ण होत आला असताना काम मात्र अद्याप ५ टक्क्यांहून अधिक शिल्लक असल्याने, हा निधी नेमका कुठे खर्च झाला आणि कामाला गती का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

का रखडला ‘पुणे मेट्रो’चा रथ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विलंबामागे तीन मुख्य कारणे समोर येत आहेत

१. मजुरांची टंचाई : पश्चिम बंगालमधील निवडणुकांमुळे या प्रकल्पावर काम करणारे अनेक मजूर आपल्या गावी परतले आहेत. यामुळे तांत्रिक कामांच्या गतीला मोठी खीळ बसली आहे.

२. अपूर्ण स्थानके : पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांपैकी अनेक ठिकाणी प्रवासी सुविधा, एस्केलेटर आणि सुशोभीकरणाची कामे अद्याप रेंगाळलेली आहेत.

३. प्रशासकीय संताप : पीआयटीसीएमआरएलकडून तांत्रिक पूर्ततेबाबत केवळ ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने वरिष्ठ प्रशासकीय वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांचे स्वप्न अधांतरी

नियोजनानुसार, पहिल्या टप्प्यात हिंजवडी बाजूकडील १२ स्थानके सुरू होणार होती. यामध्ये मेगापोलिस सोसायटी, क्वाड्रॉन बिझनेस पार्क, इन्फोसिस फेज २, विप्रो, वाकड चौक आणि बालेवाडी स्टेडियम यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. मात्र, सध्याची स्थिती पाहता जूनऐवजी आता थेट जुलैमध्ये ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण २३.२०३ किमीची मार्गिका ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले, तरी सद्यस्थिती पाहता २०२७ उजाडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“खर्चात वाढ झाल्यामुळे पेमेंट्सची टक्केवारी जास्त दिसत असली, तरी प्रत्यक्ष कामात मजुरांची टंचाई आणि तांत्रिक परवानग्यांसारखे काही अडथळे आले आहेत. पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके कार्यान्वित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मेट्रो सुरक्षा आयुक्तांच्या (CMRS) तपासणीनंतर ही सेवा प्रवाशांसाठी लवकरात लवकर खुली केली जाईल.” — रिनज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

तारीख पे तारीख’: आश्वासनांचे इमले आणि विस्कळीत मुहूर्त!

हिंजवडी मेट्रोच्या मार्गावर कामापेक्षा डेडलाईन्सचाच पाऊस अधिक पडला आहे. गेल्या काही वर्षांत प्रशासनाने बदललेले हे काही प्रमुख मुहूर्त:

मार्च २०२३ : करारावेळचे पहिले स्वप्न; मात्र प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा होण्यासच तीन वर्षे उशीर झाला.

मार्च २०२५ : कामाला सुरुवात झाल्यावर दिलेली ‘अधिकृत’ डेडलाईन; मात्र नियोजनाचा अभाव नडला.

एप्रिल २०२६ : ९४ टक्के काम झाल्याचा डांगोरा पिटला, पण प्रवासी सेवा सुरू होऊ शकली नाही.

३१ मे २०२६ : प्रशासनाने दिलेला ‘नवा मुहूर्त’; स्थानकांवरील अपूर्ण कामांमुळे तोही हवेत विरला.

१५ जून २०२६ : आताचा ताजा ‘वायदा’; पण जमिनीवरील वास्तव पाहता हा मुहूर्तही हुकणार हे स्पष्ट आहे.

विलंबाचे मुख्य कारणे

१. सुरुवातीचा विलंब : २०१८ मध्ये पायाभरणी होऊनही प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरुवात झाली (अंदाजे ३ वर्षांचा विलंब).

२. भूसंपादन : विशेषतः शिवाजीनगर आणि काही मोक्याच्या ठिकाणच्या जागेचा ताबा मिळण्यास झालेला उशीर.

३. तात्पुरते अडथळे : कोव्हिड-१९ चा काळ आणि अलीकडे पश्चिम बंगालमधील निवडणुकांमुळे झालेली मजुरांची टंचाई.

सद्यस्थिती : ८,३१३ कोटींच्या या प्रकल्पात पैसा खर्च झाला असला (९७.४०%), तरी कामाची प्रत्यक्ष प्रगती (९४.५८%) अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. त्यामुळे १५ जूनचा मुहूर्तही केवळ ‘कागदावरच’ राहण्याची शक्यता अधिक आहे.

हे सुद्धा वाचा : विकास लवांडे यांच्यावरील शाईहल्ला वारकरी संप्रदायाचा अपमान, हल्लेखारांवर कठोर कारवाई करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Web Title: Hinjewadi to shivajinagar metro is unlikely to start in june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Hinjewadi-Shivajinagar Metro
  • maharashtra
  • Pune Metro

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.