Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ मार्गावरील मेट्रो ट्रायल यशस्वी; लवकरच सुरू होणार

शुकवारी मेट्रोची माण डेपो ते पीएमआर ४ स्थानकापर्यंत पहिलीच चाचणी धाव घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे पुणे मेट्रो लाईन ३ कार्यान्वित होण्याच्या अंत‍िम टप्यापर्यंत पोहोचली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 04, 2025 | 09:55 PM
Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ मार्गावरील मेट्रो ट्रायल यशस्वी; लवकरच सुरू होणार
Follow Us
Close
Follow Us:
पुणे: माण, हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणारा एक महत्त्वाचा उपक्रम असलेल्या पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाचे काम ८७ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वर‍ित काम अंत‍िम टप्यात आहे. त्याअनुषंगाने शुकवारी (द‍ि.४) दुपारी मेट्रोची माण डेपो ते पीएमआर ४ स्थानकापर्यंत पहिली चाचणी धाव घेण्यात आली. ती यशस्वी झाली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए),  टाटा आणि सीमेन्स समूहाच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक – खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत विकसित केलेला हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. संबंध‍ित प्रकल्पाच्या कामास २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली असून या कामाची मुदत मार्च २०२६ पर्यंत आहे.
या २३.३ कि.मी लांबीच्या कॉरिडॉरमध्ये २३ स्थानके आणि विद्यमान मेट्रो मार्गांसह एकसंध इंटरचेंज असणार आहे. जे पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी जलद, सुरक्षित वाहतुकीसाठी महत्वाचे ठरणार आहे. चार आधुनिक मेट्रो ट्रेनचा सेट आला आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये तीन पूर्णपणे वातानुकूलित डब्बे असून त्याची एकूण प्रवाशी क्षमता अंदाजे एक हजार आहे. या गाड्या ताशी ८० कि.मी वेगाने धावणार आहे.
शुकवारी मेट्रोची माण डेपो ते पीएमआर ४ स्थानकापर्यंत पहिलीच चाचणी धाव घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे पुणे मेट्रो लाईन ३ कार्यान्वित होण्याच्या अंत‍िम टप्यापर्यंत पोहोचली आहे. या  मेट्रो लाईन ३ चे काम विक्रमी वेळेत पुर्ण होत असल्याने न‍िश्च‍ितच पुणे शहरासह संबंध‍ित मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

जून महिन्यात ‘पुणे मेट्रो’चा रेकॉर्ड

पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जून महिन्यात एकट्या महिन्यात तब्बल ५२ लाख ५७ हजार प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक प्रवासी संख्या असून, मेट्रोने एका महिन्यातच ५० लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे.

Pune Metro: जून महिन्यात ‘पुणे मेट्रो’चा रेकॉर्ड; तब्बल 52 लाख प्रवाशांनी केला प्रवास

महामेट्रोच्या वतीने वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गांवर सेवा सुरू आहे. दररोज सरासरी ७० हजारांहून अधिक नागरिक मेट्रोने प्रवास करत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील गणपती विसर्जनाच्या दिवशी एकाच दिवशी ३ लाख ४६ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला होता.
मेट्रोच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात मेट्रोला एकूण २ कोटी ३३ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर मे महिन्यात ही आकडेवारी होती ४७ लाख ६२ हजार प्रवासी आणि उत्पन्न २ कोटी ७२ लाख रुपये. त्यामुळे प्रवासी आणि उत्पन्न दोन्हीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Hinjewadi to shivajinagar metro trial run success pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • metro news
  • Pune
  • Pune Metro

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून नवले ब्रिजवरून खाली फेकलं; नेमकं प्रकरण काय?
1

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून नवले ब्रिजवरून खाली फेकलं; नेमकं प्रकरण काय?

Pune Crime: संतापजनक! चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार; ‘घरी सोडतो’ म्हणत कारमध्ये नेलं अन् अत्याचार;
2

Pune Crime: संतापजनक! चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार; ‘घरी सोडतो’ म्हणत कारमध्ये नेलं अन् अत्याचार;

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना
3

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना

Pune Crime: पुण्यात आणखी एक नसरापूर सारखी घटना; आजोबानेच केला नातीवर अत्याचार
4

Pune Crime: पुण्यात आणखी एक नसरापूर सारखी घटना; आजोबानेच केला नातीवर अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.