पुणे मेट्रोने रचला नवा इतिहास (फोटो- istockphoto)
Metro च्या ‘या’ टप्प्याला केंद्र सरकारची मंजूरी
पुणे मेट्रोच्या दोन महत्वाच्या विस्तारीत मार्गांना केंद्र सरकारकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी झालेल्या बैठकीत वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी (वाघोली) या मेट्रो मार्गांना हिरवा कंदील दाखवला आहे. एकूण सुमारे ३,७५६.५८ कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे पुणे मेट्रोचा शहराच्या दोन दिशांना विस्तार होणार असून, नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.
पुणेकरांसाठी खुशखबर! Metro च्या ‘या’ टप्प्याला केंद्र सरकारची मंजूरी; कसा असणार प्रोजेक्ट? पहाच…
या दोन्ही प्रकल्पांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी 20 वाटा असून उर्वरित 60% निधी हा महा-मेट्रोमार्फत कर्जाच्या स्वरूपात उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना गती मिळणार असून लवकरच टेंडर प्रक्रिया आणि प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे. पुणेकरांसाठी हा निर्णय म्हणजे वाहतूक कोंडीवरचा उपाय आणि वेगवान प्रवासासाठी एक मोठं पाऊल ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पुर्वेकडील आयटी हब मेट्रोने जोडले जाणार आहे. वनाज ते चांदणी चौक (मार्गिका २अ) या विस्तारित मार्गावर २ स्थानके (कोथरूड बस डेपो, चांदणी चौक) असून, त्याची लांबी १.२ किमी असणार आहे. यामुळे वनाज ते चांदणी चौक परिसरातील नागरिकांना मेट्रोची सुविधा उपलब्ध होईल.