Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranjangaon MIDC Traffic Jam: चाकणनंतर रांजणगावातील उद्योगही स्थलांतरित होणार?

Pune Ahmednagar Highway Traffic Jam: वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत रस्त्यांची क्षमता आणि वाहतूक व्यवस्थापन अपुरे पडत असल्याने वाहनांना अनेकदा तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागते. त्याचा थेट परिणाम उद्योगांचे दैनंदिन कामकाज, उत्पादन प्रक्रिया, मालवाहतूक आणि कामगारांच्या वेळेवर होत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 18, 2026 | 10:42 AM
Pune Ahmednagar Highway Traffic Jam:

Pune Ahmednagar Highway Traffic Jam:

Follow Us
Follow Us:
  • पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सणसवाडी ते रांजणगाव दरम्यान रोज भीषण वाहतूक कोंडी.
  • कच्च्या व तयार मालाची वाहतूक खोळंबल्याने उत्पादनावर आणि कामाच्या वेळापत्रकावर गंभीर परिणाम.
  • चाकणच्या धर्तीवर रांजणगाव व सणसवाडी पट्ट्यातील कंपन्याही स्थलांतराचा विचार करू शकतात, अशी भीती.
 

Pune Ahmednagar Highway Traffic Jam: पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा गंभीर फटका सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह परिसरातील उद्योगांना बसत आहे. वाहतूक कोंडीवर वेळीच कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास चाकणप्रमाणे या परिसरातील उद्योगांनाही स्थलांतराचा विचार करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी इंडस्ट्रीअल फेडरेशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. संघटनेचे कैलास नरके यांनी ही माहिती दिली.

पुणे-अहिल्यानगर महामार्गालगतच्या औद्योगिक वसाहतींमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर कामगार, अवजड वाहने, कच्चा माल तसेच तयार मालाची वाहतूक होते. मात्र, वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत रस्त्यांची क्षमता आणि वाहतूक व्यवस्थापन अपुरे पडत असल्याने वाहनांना अनेकदा तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागते. त्याचा थेट परिणाम उद्योगांचे दैनंदिन कामकाज, उत्पादन प्रक्रिया, मालवाहतूक आणि कामगारांच्या वेळेवर होत आहे.

Dimagi Naxal Party Instagram Trend: पंतप्रधान मोदींच्या ‘दिमागी नक्षल’ विधानाचे सोशल मीडियावर बुमरँग; ‘दिमागी

स्थलांतराचा विचार

नुकतेच चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीला कंटाळून काही उद्योगांनी स्थलांतराचा विचार सुरू केल्याचे समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न वेळीच सोडविला नाही, तर येथील उद्योगांवरही स्थलांतराची वेळ येऊ शकते, असा इशारा फेडरेशनने दिला आहे. महाराष्ट्रात नवीन उद्योग आणि गुंतवणूक आणणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच विद्यमान उद्योग टिकविणे आणि रोजगाराचे संरक्षण करणेही आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून उद्योग, रोजगार आणि राज्याच्या आर्थिक विकासाशी संबंधित असल्याचे संघटनेने मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

उद्योजकांसोबत बैठक घेण्याची केली मागणी

सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव परिसरातील उद्योजक तसेच औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक घेऊन वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी फेडरेशनने केली आहे. चाकणप्रमाणे या परिसरातील उद्योगांनाही स्थलांतराचा विचार करण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने वेळीच ठोस पावले उचलून उद्योगांना दिलासा द्यावा, अशी मागणी कैलास नरके यांनी केली आहे.

 

 

Web Title: Pune ahmednagar highway traffic jam shikrapur ranjangaon midc industries warn relocation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • ahmednagar
  • MIDC
  • Pune
  • Traffic News

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?
4

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.