Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain News: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा मुसळधार; पुढील 2 दिवस शहरात…

पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 24, 2025 | 08:13 PM
Pune Rain News: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा मुसळधार; पुढील 2 दिवस शहरात…
Follow Us
Follow Us:

गेले दोन दिवस पुण्यात पावसाने घेतलेली विश्रांती 
राज्याला पुढील दिवस यलो अलर्ट 
पुण्यात ढगाळ हवामानाची शक्यता

Waether Update: गेल्या आठवड्यात पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला होता. मुसळधार पावसाचा पुण्यात वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. पुणे शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर मागचे दोन दिवस पुण्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून आले. आता पुन्हा पुण्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे तेथे येलो अलर्ट जाहीर केला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

नैऋत्य मौसमी पाऊस हा पंजाब आणि हरियाणाचा उर्वरित भाग, राजस्थान व गुजरातचा आणखी काही भाग, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरच्या काही भागातून माघारी परतला आहे.  कालचे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिसा आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर कायम आहे.

कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा या  भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तास रायगड, पुणे, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने तिथे यलो अलर्ट जाहीर केला आहे.

Maharashtra Rain Alert: पाऊस इतका का पेटलाय? ‘या’ तारखेपासून राज्यात प्रचंड…; शेतकऱ्यांवर मोठे संकट येणार

राज्यात पावसाचा जोर कायम
पावसाचा जोर अनेक जिल्ह्यांमध्ये कायम असल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा भागात मोठे नुकसान झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. लाखों हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेक नागरिकांना लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. महाराष्ट्राच्या काही भागात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता हवामान विभागाने एक नवीन इशारा दिला आहे. अजून पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरचे संकट अजूनही संपले नसल्याचे म्हटले जात आहे. 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Imd heavy rain alert all maharashtra and pune weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 08:13 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यातील तापमानात होतेय घसरण; पुण्यात नोंदवले यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान
1

राज्यातील तापमानात होतेय घसरण; पुण्यात नोंदवले यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान

Weather Update : पहाटे दाट धुके तर दुपारी कडक उन्ह अन् रात्री पुन्हा थंडी; राज्यात संमिश्र हवामान
2

Weather Update : पहाटे दाट धुके तर दुपारी कडक उन्ह अन् रात्री पुन्हा थंडी; राज्यात संमिश्र हवामान

Weather Update : अर्धा नोव्हेंबर महिना संपला तरीही गुलाबी थंडीची अद्याप प्रतिक्षाच; तापमानात चढ-उतार सुरूच
3

Weather Update : अर्धा नोव्हेंबर महिना संपला तरीही गुलाबी थंडीची अद्याप प्रतिक्षाच; तापमानात चढ-उतार सुरूच

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात होतोय बदल; गोंदिया, चंद्रपूरसह अनेक भागांत पावसाची शक्यता
4

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात होतोय बदल; गोंदिया, चंद्रपूरसह अनेक भागांत पावसाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.