Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?

Pune Rain: पावसाचा जोर कमी असतानाच सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानही बहुतांश भागांत सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 01, 2026 | 08:35 PM
११ तारखेपर्यंत देशभरात मुसळधार पावसाची शक्यता

११ तारखेपर्यंत देशभरात मुसळधार पावसाची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • ऑगस्ट कोरडा तर सप्टेंबरमध्येही पावसाचा जोर कमीच
  • पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा २८ टक्के कमी पाऊस
  • देशभरात सप्टेंबरमध्ये ९१ टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज
पुणे/Pune Rain:  जुलैमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाल्यानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरला. शिवाजीनगर येथे ऑगस्टमध्ये केवळ ८४.६ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. गेल्या दशकातील आकडेवारीच्या तुलनेत यंदाचा ऑगस्ट तुलनेने कोरडा ठरला आहे. पुणे जिल्ह्यातही ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा २८ टक्के कमी पाऊस झाला. आता सप्टेंबरमध्येही पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे.

यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीला सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, जुलैमध्ये या अंदाजाला छेद देत पुणे शहर आणि परिसरात दमदार पाऊस झाला. शिवाजीनगर येथील जुलै महिन्यातील पावसाने ११९ वर्षांचा विक्रम मोडला. घाट परिसरातही पावसाचा जोर राहिल्याने काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला.

ऑगस्टमध्ये मात्र पावसाने मोठी विश्रांती घेतली. महिनाभर ढगाळ वातावरण राहिले; मात्र प्रत्यक्षात पावसाच्या फारशा सरी पडल्या नाहीत. शिवाजीनगर येथे ऑगस्टमध्ये ८४.६ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १३४.७ मिलिमीटर, तर २०२४ मध्ये २७९.३ मिलिमीटर पाऊस झाला होता.

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट

सप्टेंबरमध्येही हलक्या सरींची शक्यता 

पुणे शहर आणि परिसरात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, पाऊस पूर्णपणे गायब होणार नसून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस आकाश ढगाळ राहून काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. आयएमडीनेही सप्टेंबरमध्ये देशाच्या अनेक भागांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

देशभरातील सप्टेंबर महिन्याची दीर्घकालीन पावसाची सरासरी १६७.९ मिलिमीटर आहे. यंदा सप्टेंबरमध्ये देशातील एकूण पर्जन्यमान एलपीएच्या ९१ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर-पश्चिम, ईशान्य, पूर्व, पूर्व-मध्य आणि दक्षिण-पूर्व द्वीपकल्पीय भारतातील काही भागांत सामान्य ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

तापमानाचाही चटका

पावसाचा जोर कमी असतानाच सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानही बहुतांश भागांत सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसातील खंड आणि वाढत्या तापमानामुळे काही भागांत उष्णतेचा ताण जाणवण्याची शक्यता आहे.

‘एल निनो’चा प्रभाव

सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरात तीव्र ‘एल निनो’ स्थिती असून, मध्य आणि पूर्व भागातील समुद्रपृष्ठाचे तापमान सामान्यपेक्षा अधिक आहे. आगामी काळात ही स्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हिंदी महासागरात सध्या ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) तटस्थ आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार ही स्थिती सप्टेंबरपर्यंत कायम राहू शकते; मात्र आंतरराष्ट्रीय हवामान केंद्रांच्या अंदाजानुसार सप्टेंबरपासून आयओडी सकारात्मक स्थितीकडे वळण्याची शक्यता आहे.

शिवाजीनगर येथील ऑगस्टमधील पाऊस (मिलिमीटरमध्ये)

वर्ष  – पाऊस

२०१५ –  २३०.५

२०१६ –  १६२.२

२०१७ – ८६.८

२०१८ – २०९.४

२०१९ –  २५५.७

२०२० –  ४०.६

२०२१ –  १६४.२

२०२२  – ४०.६

२०२३ –  ४२.१

२०२४ –  २७९.३

२०२५ –  १३४.७

२०२६ –  ८४.६

पुणे जिल्हा

ऑगस्टची सरासरी : २६७.८ मिमी

यंदाचा पाऊस : १९३.५ मिमी

सरासरीपेक्षा घट : २८ टक्के

सप्टेंबर

देशाची दीर्घकालीन सरासरी : १६७.९ मिमी

यंदाचा अंदाज : एलपीएच्या ९१ टक्क्यांपेक्षा कमी

पुणेकरांनो सावधान ! पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज

‘ऑगस्टमध्ये पुणे शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेतही कमी पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.’

– एस. डी. सानप, हवामानशास्त्रज्ञ, पुणे वेधशाळा

Web Title: Imd pune rain update 119 years record break in july dry in august september rain forecast 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • Pune Rain
  • Pune Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

यंदा नेहमीपेक्षा कमी थंडी जाणवणार; फेब्रुवारीपासूनच सुरू होणार उन्हाळा तर जलस्रोतांसमोर मोठं संकट
1

यंदा नेहमीपेक्षा कमी थंडी जाणवणार; फेब्रुवारीपासूनच सुरू होणार उन्हाळा तर जलस्रोतांसमोर मोठं संकट

Weather Update : सातारा, सांगली, कोल्हापूरसह अनेक भागांत मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना अखेर दिलासा
2

Weather Update : सातारा, सांगली, कोल्हापूरसह अनेक भागांत मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना अखेर दिलासा

Weather Update : दिल्ली, पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी; NCR च्या तापमानात झाली मोठी घट
3

Weather Update : दिल्ली, पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी; NCR च्या तापमानात झाली मोठी घट

Weather Update : ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा कमी होणार; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
4

Weather Update : ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा कमी होणार; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.