Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंदापूर प्रशासन सज्ज; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापूर सार्वत्रिक निवडणूक  शांततेत, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 26, 2026 | 12:30 AM
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंदापूर प्रशासन सज्ज; अधिकाऱ्यांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंदापूर प्रशासन सज्ज; अधिकाऱ्यांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंदापूर प्रशासन सज्ज
  • तहसील कार्यालय इंदापूर येथे प्रशासनाची बैठक संपन्न
  • अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
इंदापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापूर सार्वत्रिक निवडणूक  शांततेत, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय इंदापूर येथे निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. निवडणूक निरीक्षक विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

 

या बैठकीस जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापूर सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते. निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, वाहतूक व पेट्रोलिंग आराखडा, मनुष्यबळ व्यवस्थापन, ईव्हीएम व निवडणूक साहित्य व्यवस्थापन, मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचे आदेश उल्लंघन, आचारसंहिता भंग, तक्रार अथवा इतर निवडणूक विषयक शंका असल्यास नागरिकांनी तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले. यासाठी हेल्पलाईन क्रमांक ०२१११–२२३१३४ वर संपर्क साधता येणार असून, तसेच निवडणूक निरीक्षक विशाल नरवाडे यांचे समन्वय अधिकारी सुरेश डुबले यांच्या मो. ८८३०८६२४५२ या क्रमांकावरही माहिती अथवा तक्रार नोंदवता येणार आहे.

हे सुद्धा वाचा : ग्रामपंचायतीवर येणार प्रशासनराज, राज्य शासनाकडून परवानगी; सांगली जिल्ह्यातील 155 गावच्या निवडणुका लांबणीवर

सुव्यवस्था अबाधित ठेवावी

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचनाही देण्यात आल्या. ही आढावा बैठक निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

भरणे-पाटील मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार?

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात माजी सहकार मंत्री व राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर उमेदवारी घेतली असून, या निवडणुकीत इंदापूर तालुक्याचे आमदार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत एकत्र जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करत, दोघांच्या मनोमिलनाचे नवे पर्व घोषित केले आहे. या अनपेक्षित समीकरणामुळे इंदापूर तालुक्याच्या राजकारणाला नवे वळण लागले असून, भरणे व पाटील या दोन नेत्यांची मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार?, हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

Web Title: Indapur administration is fully prepared for the zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Election Commision
  • Election News
  • indapur news

संबंधित बातम्या

Lemon Price : उन्हाची चाहूल लागताच लिंबाच्या दरात झपाट्याने वाढ; एका किलोचा दर…
1

Lemon Price : उन्हाची चाहूल लागताच लिंबाच्या दरात झपाट्याने वाढ; एका किलोचा दर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.