Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात FDA चा दणका; 12 हॉटेल, रेस्टॉरंट व बेकरींचे परवाने थेट निलंबितच केले

एफडीएने नागरिकांना निकृष्ट, अस्वच्छ किंवा दिशाभूल करणाऱ्या अन्नपदार्थांबाबत तक्रारी करण्याचे आवाहन केले असून १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 24, 2026 | 03:21 PM
FDA चा दणका; 12 हॉटेल, रेस्टॉरंट व बेकरींचे परवाने निलंबित

FDA चा दणका; 12 हॉटेल, रेस्टॉरंट व बेकरींचे परवाने निलंबित

Follow Us
Follow Us:

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात मोठी कारवाई करत अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नपदार्थांची साठवणूक आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ हॉटेल, रेस्टॉरंट व बेकरींचे परवाने निलंबित केले आहेत. या कारवाईदरम्यान सुमारे ३ लाख ४८ हजार रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

एफडीएने १८ आणि २१ जुलै रोजी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, मावळ, जुन्नर, खेड तसेच सातारा जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवली. तपासणीत अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळल्याने संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड, पंढरपूर आणि वडूज येथील काही आस्थापनांवर छापे टाकून गुन्हेही दाखल करण्यात आले.

कोणत्या आस्थापनांवर कारवाई?

पुणे व पिंपरी-चिंचवड : हॉटेल लोकप्रिय (मार्केट यार्ड), जय सद्गुरू इराणी चहा अँड स्नॅक्स सेंटर (मार्केट यार्ड), फोक्लो टेक्नोलॉजी प्रा. लि. (बावधन), स्वीस्टा ईएनटी एंटरप्रायझेस प्रा. लि. (औंध) आणि अक्सा बेकरी (आदर्शनगर).

पुणे जिल्हा : टोणी दा ढाबा (कामशेत, मावळ), फाउंटन प्युअर व्हेज (आळेफाटा, जुन्नर) आणि केएम फुड्स (वरची भांबुरवाडी, खेड).

सातारा जिल्हा : शालिमार उडपी व्हेज रेस्टॉरंट आणि सुरभी हॉटेल अँड बार (वडूज, खटाव).

एफडीएने नागरिकांना निकृष्ट, अस्वच्छ किंवा दिशाभूल करणाऱ्या अन्नपदार्थांबाबत तक्रारी करण्याचे आवाहन केले असून १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच खाद्य व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न पुरवावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दुधाच्या उत्पादनात घट

दुधात पाणी मिसळूनही न थांबलेला भेसळीचा खेळ आता थेट रासायनिक पदार्थांपर्यंत पोहोचला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकाराविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईनंतर काही दूध संघांच्या दूध संकलनात घट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे “दूध उत्पादन घटले की आतापर्यंत दुधाच्या नावाखाली सुरू असलेली भेसळ थांबली?”

दूध घटले की भेसळ थांबली? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतर काही दूध संघांच्या संकलनात घट

Web Title: Licenses of 12 hotels restaurants and bakeries summarily suspended in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • FDA Raid
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना
1

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
2

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
3

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
4

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.