Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवैध माती, मुरुम उत्खनन जोमात; वरवंड येथील प्रकार; पाटबंधारे विभागाचे अधिकारी हतबल

दौंड तालुक्यातील वरवंड येथील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे या तलावातील माती आणि मुरूम उत्खनन करण्यासाठी स्थानिक माफियांनी सपाटा लावला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 20, 2026 | 07:00 PM
अवैध माती, मुरुम उत्खनन जोमात; वरवंड येथील प्रकार; पाटबंधारे विभागाचे अधिकारी हतबल

अवैध माती, मुरुम उत्खनन जोमात; वरवंड येथील प्रकार; पाटबंधारे विभागाचे अधिकारी हतबल

Follow Us
Follow Us:

पाटस : दौंड तालुक्यातील वरवंड येथील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे या तलावातील माती आणि मुरूम उत्खनन करण्यासाठी स्थानिक माफियांनी सपाटा लावला आहे. काही पाटबंधारे आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी सुरू आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितावर कारवाई करण्यासाठी दौंड तहसीलदार, वनपरिक्षेत्राधिकारी आणि यवत पोलीस स्टेशनला कारवाई करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता उत्कृर्ष पाटील यांनी दिली.

 

पाटबंधारे विभागाच्या पाटस येथील कार्यालयाच्या देखरेखीखाली वरवंड येथील व्हिक्टोरिया तलाव आहे. सध्या तलावातील पाणीसाठा पाणीसाठा जवळजवळ संपुष्टात आल्याचे चित्र आहे. परिणामी पाणीसाठा कमी झाल्याने तलावात स्थानिक आणि आजुबाजूच्या काही माती आणि मुरूम माफियांनी जेसीबी मशीन व ट्रॅक्टर आणि पोकलेन तलावात उतरवले आहेत. तलावातील माती अनधिकृतपणे उपसा करून वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यातून वाहतूक केली जात आहे. या संदर्भात तक्रारी आल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन माती उपसा करत असलेले मशीन घटनास्थळी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पुरेसे कर्मचारी नसल्याने मशीन अडवून ठेवण्यात यश आले नाही. या मशीनद्वारे अंदाजे १०० ब्रास माती अनधिकृतपणे उपसा केल्याचे दिसून आले आहे. मात्र तरीही काही जण रात्रीच्या सुमारास माती आणि मुरूम उत्खनन करीत आहेत.

माती माफिया, ट्रॅक्टर व मशीन मालकावर कारवाईची मागणी

शासनाच्या मालमत्तेवर हे माफिया खुलेआम गौण खनिजाची चोरी करीत आहेत. हा प्रकार भारतीय दंड संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा आहे. त्यामुळे या मुरुम आणि माती चोरी केल्याप्रकरणी संबंधित माती माफिया आणि ट्रॅक्टर व मशीन वर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार पाटबंधारे विभागाने यवत पोलीस ठाणे, दौंड तहसीलदार आणि दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे केली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी पाटील यांनी दिली.

जलवाहिनीच्या पाईप तुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

दरम्यान, काही राजकीय मंडळींचा या माती चोरीत सहभाग असल्याने मोठ्या नेत्यांच्या राजकीय दबावतंत्राचा वापर करत ते पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, वन विभाग यांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे चित्र आहे. आपल्यावर मोठ्या नेत्याचा आशीर्वाद असल्याने आपल्यावर कोण कारवाई करणार आणि कोणाची हिंमत आहे, अशा आवरभावात हे माफिया तलावात लगतच्या शेतकऱ्यांच्या शेत पिकातून भरधाव वेगाने मातीने भरलेले वाहने चालवत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी नेलेल्या जलवाहिनीच्या पाईप तुटल्याने नुकसान झाले आहे. सध्या या मातीला वीटभट्टी व्यवसायिकांडून मोठी मागणी असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Locals are excavating soil from a lake in varwand daund taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Daund News
  • Farmers

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी
4

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.