(फोटो- सोशल मिडिया)
घरगुती, व्यावसायिक वापरासाठी इंडक्शन ठरतोय पर्याय
गॅसअभावी इंडक्शन स्टोव्हला वाढती मागणी
युद्धजन्य स्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा तीव्रपणे जाणवत असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गृहिणींच्या दैनंदिन स्वयंपाक व्यवस्थेवर याचा थेट परिणाम झाला आहे. गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक कुटुंबांनी पर्याय म्हणून इंडक्शन स्टोव्हचा वापर सुरू केला असून, त्याला झपाट्याने मागणी वाढत आहे.
सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. परिणामी, सिलिंडर वितरणात विलंब होत असून वाढत्या मागणीमुळे ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नाही. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील अनेक नागरिकांनी स्वयंपाकासाठी इंडक्शनचा पर्याय स्वीकारला आहे. विशेषतः नोकरदार वर्ग आणि लहान कुटुंबांमध्ये इंडक्शन अधिक सोयीस्कर ठरत आहे.घरगुती वापरासोबतच हॉटेल, खानावळी आणि लहान व्यावसायिकांनीही इंडक्शनचा वापर सुरू केला आहे.
Iran Israel युद्धामुळे कणकवलीत हॉटेल व्यवसायावर संक्रांत; खानावळी आणि नाश्त्याची दुकाने बंद…
गॅसअभावी व्यवसाय ठप्प होण्याची भीती निर्माण झाल्याने अनेकांनी या पर्यायाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल आणि खानावळी चालकांसमोर गॅस तुटवड्यामुळे मोठे संकट उभे राहिले होते. मात्र, इंडक्शनच्या मदतीने त्यांनी काही प्रमाणात व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जरी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करण्यासाठी मर्यादा असल्या, तरी चहा, नाश्ता यांसारख्या झटपट पदार्थांसाठी इंडक्शन उपयुक्त ठरत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. नियमित आणि वेळेवर सिलिंडर उपलब्ध झाल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. अन्यथा, भविष्यात नागरिकांना इंडक्शनसारख्या पर्यायांवर अधिक अवलंबून राहावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
इंडक्शनचे दर
• साधे इंडक्शन स्टोव्ह : १,५०० ते २,५०० रुपये
• मध्यम दर्जाचे (अधिक वैशिष्ट्यांसह) : २,५०० ते ४,००० रुपये
• व्यावसायिक वापरासाठी इंडक्शन : ७,००० ते १५,००० रुपये
गॅस एजन्सीचालक मस्त, ग्राहक मात्र त्रस्त! भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहून गॅस मिळविण्याची वेळ
कणकवलीत हॉटेल व्यवसायावर संक्रांत
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अखाती देशांमधून होणारा गॅस पुरवठा थांबल्यामुळे देशात गॅस टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. परिणामी व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल व्यवसायावर संक्रांत ओढवली आहे. या संकटातून सावरण्यासाठी हॉटल व्यावसायिकांनी इलेक्ट्रिक शेगडी व चुलीचा आधार घेतला आहे. मात्र, सिलिंडरअभावी हॉटेल व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे.






