
या मंजुरीनंतर पूर्व व दक्षिण पुण्यातील विस्तारणाऱ्या उपनगरांना मेट्रोची जोड मिळणार आहे. हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड परिसरातील नागरिकांना या मेट्रोमुळे मध्यवर्ती पुण्यात सहज पोहोचता येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचेल तसेच प्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येईल.
पुढील प्रक्रिया आणि पार्श्वभूमी
महामेट्रोकडून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल हा २०२३ मध्ये सादर करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यासोबत सखोल चर्चा झाली. फेब्रुवारी २०२५ मध्ये पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीने या योजनेला मंजुरी दिली.
या संपूर्ण मेट्रो टप्पा–२ अंतर्गत खडकवासला–स्वारगेट–हडपसर–खराडी असा ३१.६४ किमीचा विस्तृत मार्ग प्रस्तावित आहे. संबंधित प्रकल्प अहवाल मार्च २०२५ मध्ये केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, सध्या केंद्र शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, राज्य शासनाने जमीन अधिग्रहण, पर्यावरण मंजुरी आणि निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
Pune News: पुणे Metro ड्रायव्हरलेस सेवा देणार! ‘या’ मार्गावर होणार सुरूवात, मात्र कारण काय?
नागरिकांना होणारे लाभ
या मेट्रो मार्गिकांमुळे पूर्व पुणे आणि ग्रामीण भागाला शहराशी सुलभ जोडणी मिळेल.
दररोज हजारो प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल.
शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि रस्त्यावरील वाहनांचा ताण घटेल.
इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रणास मदत मिळेल.
या प्रकल्पामुळे पुणे मेट्रोचे जाळे अधिक विस्तारित होणार असून, पूर्व आणि दक्षिण पुण्याचा विकास वेगाने होईल, असा विश्वास अजित पवार यांनी या निर्णयाची माहिती देतांना व्यक्त केला.