पुणे मेट्रो (फोटो istockphoto )
पुणे मेट्रोला प्रवाशांची वाढती मागणी
ड्रायव्हरलेस सेवा लवकरच सुरू होणार
खडकवसला ते खराडी या मार्गावर लागू होणार
पुणे: पुणे मेट्रो आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात (फेज २) विनाचालक रेल्वे (ड्रायव्हरलेस ट्रेन) सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. ही सेवा सुरुवातीला खडकवसला ते खराडी या मार्गावर लागू केली जाणार आहे. पुणे शहरातील वाढती प्रवासी मागणी लक्षात घेता, या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी चुका कमी होणार आणि वेळेवरता अधिक वाढेल, अशी माहिती मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मेट्रोच्या सध्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) मेट्रो लाईन ४ मध्ये ATO (Attended Train Operation) मोड असावा, ज्यामध्ये ट्रेनमध्ये एक ड्रायव्हरसारखा व्यक्ती असेल जो सिग्नलिंग आणि ऑपरेशन्सचे निरीक्षण करेल. मात्र, वाढती प्रवासी मागणी आणि ट्रान्सशिपमेंट लक्षात घेता, पुणे मेट्रो UTO (Unattended Train Operation) मोड लागू करण्याचा विचार करत आहे. याचा अर्थ असा की ट्रेन ऑपरेशन्स पूर्णपणे, चालकाशिवाय (ड्रायव्हरलेस) पद्धतीने प्रणालीद्वारे पार पडतील.
दुसऱ्या टप्प्यामधील लाईन-४ ही ३१.६ किलोमीटर लांबीची असून २८ स्थानके असतील. मुख्य मार्ग खडकवासला ते खराडी असा असेल. या मार्गावर ड्रायव्हरलेस ऑपरेशन्ससाठी ७५ कोचेस (२५ ट्रेनसेट्स) खरेदी करण्याची योजना आहे. या लाईनवर युटीओ -आधारित सिग्नलिंग, सार्वजनिक घोषणा प्रणाली, प्रवासी माहिती प्रदर्शन प्रणाली, मास्टर क्लॉक, व्हॉइस रेकॉर्डिंग, टेलिफोन प्रणाली, सायबर सुरक्षा, सीसीटीव्ही आणि फायबर ऑप्टिक ट्रान्समिशनसारखी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
टप्प्याटप्प्याने फेज १ ही ड्रायव्हरलेस