Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSRP Plate: नंबरप्लेट बदलण्याच्या प्रक्रियेला वाहनधारकांचा अत्यल्प प्रतिसाद; मिळाली चौथ्यांदा मुदतवाढ

Pune News: पुणे शहरात सुमारे २५ लाख वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी पाटी’बसविणे आवश्यक आहे. परंतु आतापर्यंत फक्त साडेपाच लाख वाहनांनाच या पाट्या बसविल्या गेल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 13, 2025 | 08:15 PM
HSRP Plate: नंबरप्लेट बदलण्याच्या प्रक्रियेला वाहनधारकांचा अत्यल्प प्रतिसाद; मिळाली चौथ्यांदा मुदतवाढ
Follow Us
Close
Follow Us:
पुणे: वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी पाटी’ (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ) लावण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट निश्चित केली होती. मात्र, वाहनधारकांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता याला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. किचकट प्रक्रिया, पुरेशा माहितीचा अभाव आणि विक्रेत्यांकडून ज्यादा पैशांची मागणी यामुळे ही योजना कासवगतीने सुरू आहे. परिणामी, राज्य परिवहन विभागाला आता पर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ द्यावी लागली आहे.तरीदेखील अपेक्षित वाहनांची संख्या गाठता आलेली नाही.
पुणे शहरात सुमारे २५ लाख वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी पाटी’बसविणे आवश्यक आहे. परंतु आतापर्यंत फक्त साडेपाच लाख वाहनांनाच या पाट्या बसविल्या गेल्या आहेत. वाहनधारकांनी नवीन नंबरप्लेट बसवून घ्यावे याकरिता परिवहन विभागाने विविध स्तरावर प्रयत्न केले. यात १ हजार रुपये दंडाची अट व नवीन नंबरप्लेट नसेल तर संबंधित वाहनांची आरटीओतील कामावर निर्बंध आणण्याचा देखील निर्णय झाला, तरी देखील वाहनधारकांचा प्रतिसाद लाभला नाही. परिणामी, विभागाला पुन्हा सुमारे एका महिन्याची मुदतवाढ द्यावी लागत आहे. या संदर्भात परिवहन विभाग लवकरच अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढणार आहे.

एचएसआरपी  म्हणजे काय? 

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट; चोरी व बनावट नंबर टाळणारी सुरक्षा पाटी.

 का आवश्यक? – वाहन ओळख सोपी, चोरी रोखणे, वाहतूक नियम अंमलबजावणी सुलभ.
कोणाला लावावी लागते? – सर्व जुनी व नवी वाहने (दोन/चार चाकी).
न लावल्यास दंड? – ₹1,000 दंड + आरटीओ कामांवर बंदी.
 नवीन मुदत? – आणखी १ महिना; पुढे डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढ शक्य.

15 ऑगस्टनंतरही ‘या’ वाहनांवर होणार नाही दंडात्मक कारवाई

सध्या अनेक वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) असल्याचे पाहिला मिळत आहे. तर काही वाहनांवर अद्यापही अशा नंबर प्लेट दिसत नाही. परिवहन विभागाने एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी अंतिम मुदत 15 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती.

HSRP Plate : 15 ऑगस्टनंतरही ‘या’ वाहनांवर होणार नाही दंडात्मक कारवाई; कारणही आहे तसंच…
15 ऑगस्टनंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे थेट 1 ते 10 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, ज्यांनी 15 ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट बुक केली आहे, परंतु फिटमेंट त्या नंतरच्या तारखेला आहे, त्यांना दंड लागणार नाही. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना (दुचाकी, तिनचाकी, चारचाकी, व्यावसायिक आणि खासगी) एचएसआरपी बसवणे कायद्याने बंधनकारक आहे. यामध्ये क्रोमियम आधारित होलोग्राम, लेसर-एच्ड युनिक आयडी आणि नॉन-रिमूव्हेबल स्नॅप लॉक असलेल्या टॅम्पर-प्रूफ प्लेट्सचा समावेश आहे.

Web Title: Maharashtra government rto extend hsrp number plate date pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • HSRP
  • Pune
  • pune news
  • RTO

संबंधित बातम्या

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा
1

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
2

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
3

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…
4

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.