Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शिक्षणमंत्री राजीनामा द्या, अध्यक्ष राजीनामा द्या’! ‘टीईटी’ पेपरफुटीच्या निषेधार्थ विविध विद्यार्थी संघटनांचे जोरदार आंदोलन

Student Protest Against TET Paper Leak: महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ चा पेपर ठाण्यात फुटल्याच्या घटनेनंतर पुण्यात विविध विद्यार्थी संघटनांनी जोरदार आंदोलन करत निषेध नोंदवला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 29, 2026 | 08:39 PM
student

student

Follow Us
Follow Us:
  • शिक्षणमंत्री राजीनामा द्या, अध्यक्ष राजीनामा द्या
  • टीईटी’ पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांचे जोरदार आंदोलन
  • एनएसवायएफ, एसएफआय या संघटनेच्या मागण्या
पुणे शहर: महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ चा पेपर ठाणे येथे फुटल्याच्या घटनेच्या निषेधार्थ न्यू स्टुडंट्स अँड युथ फेडरेशन (एनएसवायएफ), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तसेच विविध विद्यार्थी संघटनांनी सोमवारी जोरदार आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात शिक्षणमंत्री राजीनामा द्या, अध्यक्ष राजीनामा द्या!, घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

 

राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरात ३७ जिल्ह्यातील एकूण एक हजार ७२९ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा २८ जून रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित होते. परीक्षेसाठी उच्चांकी नोंदणी झाली होती. त्यात २ लाख ९० हजार ६६९ पुरुष, २ लाख ३७ हजार ४४८ महिला, पाच तृतीयपंथी अशा एकूण चार लाख २८ हजार १२२ परीक्षार्थींनी ‘पेपर एक’ आणि ‘पेपर दोन’ असे मिळून सहा लाख १२५ अर्ज भरले होते. यात सात हजार १३९ दिव्यांगांचा समावेश होता.

Ketan Agrawal : लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ

मात्र, शनिवारी पहाटे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे टीईटी परीक्षेचे पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचे प्रकरण ताजे असतानाच टीईटी परीक्षेचेही पेपर फुटल्याने राज्यभरात खळबळ उडाली. तसेच या बाबत शिक्षण क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तसेच विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात आले. परीक्षेचा सुधारित दिनांक यथावकाश जाहीर केला जाणार असल्याचे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या निष्काळजी व बेजबाबदार कारभारावर टीका करत, वारंवार होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप केला. अनेक उमेदवारांनी परीक्षा देण्यासाठी दूरवरून प्रवास केला, निवास आणि इतर खर्च केला असून त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धनंजय दळवी म्हणाले की, “राज्यात सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. नीट, टीईटी तसेच इतर परीक्षांमधील गैरप्रकारांना जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. राज्य परीक्षा परिषदेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना अटक करावी. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावरचा लढा सुरू ठेवेल. यापुढे कोणत्याही परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटू नये, यासाठी कडक कायदे आणि प्रभावी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.

एसएफआय महाराष्ट्र राज्याचे राज्यसचिव , सोमनाथ निर्मळ म्हणाले की, टीईटी पेपरफुटी प्रकरण अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

अभिषेक शिंदे म्हणाले की, टीईटी परीक्षेचा पेपर फुटणे हा शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाल्याचं लक्षण आहे. नीट, टीईटी सतत पेपर फुटण्याची मालिका सुरू आहे. याची जबाबदारी कुणी घ्यायला तयार नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जबादारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे.

एसएफआय जिल्हाध्यक्ष पुणे संस्कृती गोडे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पेपर माफियांना आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेला SFI कधीही माफ करणार नाही. टीईटी पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींना कठोर शिक्षा आणि परीक्षा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्यासाठी आमचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”

अध्यक्षांची खुर्ची दालनाबाहेर आणून माठ ठेवत आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांच्या दालनातून खुर्ची बाहेर आणून त्यावर माठ ठेवत अनोखे आंदोलन केले. पेपरफुटीच्या घटनांबाबत निषेध व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियते विरोधात हा प्रतीकात्मक आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक कायदे करण्याची मागणी केली.

आंदोलनाचा दिला इशारा

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत न्यू स्टुडंट्स अँड युथ फेडरेशन (एनएसवायएफ), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या संघटनेने भविष्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

एनएसवायएफ, एसएफआय या संघटनेच्या मागण्या

  • मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घ्यावी आणि शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
  • अकार्यक्षम एमएससीई च्या अध्यक्षणी तात्काळ राजीनामा द्यावा.
  • ‘टीईटी’ पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून यामागील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करण्यात यावी.
  • पुनर्परिक्षेसाठी पारदर्शक परीक्षापद्धतीचा अवलंब करावा. यासाठी पद्धती जाहीर करावी.
  • परीक्षा रद्द झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे. पुढील परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोफत एसटी बस/रेल्वे प्रवासाची सोय करण्यात यावी.
  • शिक्षणविरोधी नवीन शिक्षण धोरण २०२० रद्द करावे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मागण्या

  • राज्य परीक्षा परिषदेची उच्चस्तरीय चौकशी करावी.
  • पेपरफुटी प्रकरणातील सर्व सूत्रधारांना तातडीने अटक करावी.
  • अधिकारी व संबंधित खासगी घटकांच्या संगनमताची चौकशी करावी.
  • विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कडक कायदे व प्रभावी सुरक्षा व्यवस्था लागू करावी.
  • पेपरफुटीमुळे बाधित विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.
केतन अग्रवालला न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांचा कॅण्डल मार्च; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

Web Title: Maharashtra tet paper leak 2026 pune student protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 08:39 PM

Topics:  

  • Paper Leak Case
  • Student Protest
  • TET Exam
  • TET Protest

संबंधित बातम्या

Maha TET Exam Online: महा टीईटी परीक्षा पुढच्या वर्षापासून ऑनलाईन होणार; पेपर लीकनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय
1

Maha TET Exam Online: महा टीईटी परीक्षा पुढच्या वर्षापासून ऑनलाईन होणार; पेपर लीकनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra TET Paper Leak: टीईटी पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे बिहारमध्ये; ‘या’ मुख्य आरोपीच्या पत्नीला पाटणातून करण्यात आली अटक
2

Maharashtra TET Paper Leak: टीईटी पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे बिहारमध्ये; ‘या’ मुख्य आरोपीच्या पत्नीला पाटणातून करण्यात आली अटक

‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय…’; TET पेपरफुटीवरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर; भर अधिवेशनात फटकारलं
3

‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय…’; TET पेपरफुटीवरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर; भर अधिवेशनात फटकारलं

Paper Leak Cases: गेल्या काही वर्षांत ‘या’ मोठ्या परीक्षांना बसला पेपर लीकचा डाग; लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर
4

Paper Leak Cases: गेल्या काही वर्षांत ‘या’ मोठ्या परीक्षांना बसला पेपर लीकचा डाग; लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.