Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गेल्या आठ महिन्यांत माळेगाव कारखान्याला 70 कोटींचा तोटा’; युगेंद्र पवार यांचा आरोप

आठ महिन्यात त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्यामुळेच माळेगाव कारखान्याच्या डिस्टिलरी कारखान्यावर शेखर गायकवाड या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एखादा कारखाना आजारी पडायला वेळ लागत नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 07, 2026 | 10:24 AM
माळेगाव कारखान्याला या आठ महिन्यात ७० कोटीचा तोटा

माळेगाव कारखान्याला या आठ महिन्यात ७० कोटीचा तोटा

Follow Us
Follow Us:
  • कारखान्याला आठ महिन्यात ७० कोटींचा तोटा
  • सोमेश्वरच्या सभासदांनी तिथे जाऊन पाहावे
  • आठ महिन्यात मोठा भ्रष्टाचार
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याला या आठ महिन्यात ७० कोटींचा तोटा झाला असून, माळेगाव कारखान्याच्या डिस्टिलरी कारखान्यामध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केला.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील ती सोमेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारसभांमध्ये युगेंद्र पवार यांनी हा आरोप केला. यावेळी युगेंद्र पवार म्हणाले, माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामती तालुक्यातीलच आहे, या कारखान्याचे चेअरमन स्वतः अजितदादा झाले होते. अजितदादांचे निधन होऊन आठ महिने झाले आहेत. मात्र, त्या ठिकाणची काय अवस्था आहे, हे सोमेश्वरच्या सभासदांनी तिथे जाऊन पहावे. या आठ महिन्यांमध्ये ७० कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे. त्या कारखान्याची डिस्टिलरी बंद आहे, या डिस्टिलरी प्रकल्पाला कुलूप लावलेले आहे.

या आठ महिन्यात त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्यामुळेच माळेगाव कारखान्याच्या डिस्टिलरी कारखान्यावर शेखर गायकवाड या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एखादा कारखाना आजारी पडायला वेळ लागत नाही. आठ महिन्यात माळेगावची ही अवस्था होत असेल तर सोमेश्वरच्या सभासदांनी याचा विचार करावा.एक टर्म पाच वर्षाची असते. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या सुज्ञ सभासदांनी या सर्व बाबींचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

पवार साहेबांच्या माध्यमातून नवी दिशा मिळणार

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला पवार साहेबांच्या माध्यमातून नवी दिशा मिळणार आहे. ही निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रपंच्याशी निगडित आहे. अजितदादा असताना सोमेश्वर कारखाना व्यवस्थित चालला, मात्र आज अजितदादा नाहीत, त्यावेळी अडचण आलेल्या ठिकाणी स्वतः पवार साहेब देखील सोमेश्वर कारखान्याला मदत करत होते. यापुढे देखील त्यांचे मार्गदर्शन कारखान्याला मिळणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांसह इतर सभासद उपस्थित होते.

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

Web Title: Malegaon factory incurred a loss of 70 crores in the last eight months alleges yugendra pawar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • baramati news
  • Malegaon Sugar Factory
  • Yugendra Pawar

संबंधित बातम्या

Someshwar Election : ‘अजितदादांचे विचार पुढे न्यायचे असतील तर कारखाना माझ्या हातात द्या’; युगेंद्र पवारांचे आवाहन
1

Someshwar Election : ‘अजितदादांचे विचार पुढे न्यायचे असतील तर कारखाना माझ्या हातात द्या’; युगेंद्र पवारांचे आवाहन

Someshwar Sugar Factory Election 2026: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत! युगेंद्र पवारांकडून उमेदवारांची यादी जाहीर
2

Someshwar Sugar Factory Election 2026: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत! युगेंद्र पवारांकडून उमेदवारांची यादी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.