Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंधश्रद्धेचा बाजार तेजीत; खरात प्रकरणानंतर भोंदू बाबांवर कारवाईची मागणी तीव्र

कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यात उघड होत असलेल्या धक्कादायक प्रकारांमुळे भोंदू बाबांच्या वाढत्या सुळसुळाटाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 22, 2026 | 11:44 AM
अंधश्रद्धेचा बाजार तेजीत; खरात प्रकरणानंतर भोंदू बाबांवर कारवाईची मागणी तीव्र

अंधश्रद्धेचा बाजार तेजीत; खरात प्रकरणानंतर भोंदू बाबांवर कारवाईची मागणी तीव्र

Follow Us
Follow Us:

बारामती/अमोल तोरणे : कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यात उघड होत असलेल्या धक्कादायक प्रकारांमुळे भोंदू बाबांच्या वाढत्या सुळसुळाटाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विविध तपास यंत्रणा, सामाजिक संघटना आणि स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ‘किमती खडे’, ‘ग्रहबाधा निवारण’ आणि ‘भविष्य बदलणारे उपाय’ यांच्या नावाखाली नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत आहे.

 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अनेक भोंदू स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करतात. ते आधी लोकांचा विश्वास जिंकतात आणि नंतर हळूहळू त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळतात. काही प्रकरणांमध्ये महिलांचे शोषणही झाल्याचे समोर आले आहे.”
सामाजिक कार्यकर्त्यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्याने सांगितले की, “बेरोजगारी, आजारपण आणि कौटुंबिक समस्या यामुळे लोक मानसिकदृष्ट्या कमकुवत होतात. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत भोंदू बाबा त्यांना जाळ्यात ओढतात. हे केवळ आर्थिक नाही, तर मानसिक गुलामी निर्माण करणारे जाळे आहे.” मानसशास्त्रज्ञांच्या मते, संकटात सापडलेल्या व्यक्तींना तात्काळ उपाय हवा असतो. “लोकांना वाटते की एखादा चमत्कारिक उपाय त्यांच्या समस्या सोडवेल. हीच मानसिकता भोंदूगिरीला खतपाणी घालते,” असे एका तज्ज्ञाने स्पष्ट केले.

कॅप्टन अशोक खरात प्रकरणातही याच पद्धतीने विश्वास संपादन करून विशेषतः महिलांना लक्ष्य करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे समाजात संताप व्यक्त होत असून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान महाराष्ट्रात यापूर्वी अनेक भोंदू बाबांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महिलांचे देखील शोषण काही भोंदू बाबांनी केल्याचे निष्पन्न झाले होते, बारामती परिसरातील असाच एक भोंदू बाबा देखील मोठा चर्चेत आला होता. सुरुवातीला अटकेत असलेला हा बाबा पुन्हा आपले बस्तान बसवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान काही परप्रांतीय भोंदू बाबांच्या मायाजालात असलेले अनेक दिग्गज नेते, आपले ध्येय किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी अघोरी उपायाकडे देखील वळाल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे. भोंदूगिरीच्या माध्यमातून कोट्यावधीची माया जमवण्याचे भोंदू बाबांचे पेव महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

राज्य शासनानेही अशा प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी मोहीम राबवण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “कोणत्याही चमत्कारिक दाव्यांवर विश्वास ठेवू नका. संशयास्पद व्यक्ती किंवा प्रकार दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या.” तज्ज्ञांच्या मते, अंधश्रद्धेविरोधात केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर जनजागृतीही तितकीच आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिक्षणाच्या माध्यमातूनच या समस्येवर दीर्घकालीन उपाय शक्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

हे सुद्धा वाचा : जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात; दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Web Title: Many charlatans in the state are deceiving citizens under the pretext of predicting the future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • baramati
  • CM Devedra Fadnavis

संबंधित बातम्या

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
1

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
3

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
4

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.