Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेससह ठाकरे गटाला पडणार खिंडार; रविंद्र धंगेकर यांच्यासह अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) व भाजपामध्ये इनकमिंग वाढले आहे. एकीकडे मुंबईत शिवसेना ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 31, 2025 | 07:34 AM
काँग्रेससह ठाकरे गटाला पडणार खिंडार; रविंद्र धंगेकर यांच्यासह अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात?

काँग्रेससह ठाकरे गटाला पडणार खिंडार; रविंद्र धंगेकर यांच्यासह अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात?

Follow Us
Follow Us:

पुणे  : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळींचे पक्षबदल होताना दिसत आहे. असे असताना विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे आघाडीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्था पसरली आहे. आघाडीचे अनेक नेते पक्षांतर करण्याच्या प्रयत्नात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) व भाजपमध्ये इन्कमिंग वाढले आहे.

एकीकडे मुंबईत शिवसेना ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटही अधिक्र सक्रिय होऊन शिंदे सेना ठाकरे गटाला धक्के देत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच महायुतीत सुरू झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ‘ऑपरेशन टायगर’संदर्भात भाष्य करताना काही माजी आमदार व खासदार आमच्या संपर्कात असून, लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल, असा दावा केला होता. त्यानुसार, आता पडद्यामागून शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

अनेक माजी आमदारांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश केला जाणार आहे. यात काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रविंद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा आहे. सूत्रानुसार, शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वात 5 माजी आमदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असून ते सामंत यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यात 2 काँग्रेस नेते आणि 4 माजी आमदार असून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचाही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे समजते.

चंद्रकांत मोकाटेही सोडणार ठाकरेंची साथ

काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना बैठकीत नाराज होऊन उठून गेलेले चंद्रकांत मोकाटेही ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर व हुसेन दलवाई यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची गुरुवारी भेट घेतली. काँग्रेसचे दोन नेते एकनाथ शिंदेच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, हुसेन दलवाई यांनी पक्षप्रवेशाचे वृत्त फेटाळले आहे.

कोणकोणते नेते संपर्कात

शिवसेने (एकनाथ शिंदे) च्या संपार्कात काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर, ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर, कोथरूडचे माजी आमदार (ठाकरे गट) चंद्रकांत मोकाटे, रत्नागिरीचे माजी आमदार (ठाकरे गट) गणपत कदम, संगमेश्वरचे माजी आमदार (ठाकरे गट) सुभाष बने, कांग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

अहिल्यानगरात ठाकरे गटाला धक्का

अहिल्यानगर शहरातील नाराज उद्धव ठाकरे गटाचे माजी महापौर व नगरसेवकांनी गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. या सर्वांच्या प्रवेशाने अहिल्यानगर शहरातील उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेडगे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी शिवसेने (शिंदे) त प्रवेश केला.

 

Web Title: Many leaders including ravindra dhangekar are in touch with shiv sena nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 07:16 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल; एकनाथ शिंदेंचे ‘मिशन मोड’वर काम करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश
1

महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल; एकनाथ शिंदेंचे ‘मिशन मोड’वर काम करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश

Amruta Khanvilkar: अभिनयासोबत उद्योजकतेतही अमृताची झेप; अवघ्या ५ महिन्यांत ६१ ब्रँड्सना एकत्र आणत भरवलं ‘अमूल्यवैभव’ प्रदर्शन
2

Amruta Khanvilkar: अभिनयासोबत उद्योजकतेतही अमृताची झेप; अवघ्या ५ महिन्यांत ६१ ब्रँड्सना एकत्र आणत भरवलं ‘अमूल्यवैभव’ प्रदर्शन

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा
3

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
4

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.