Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकार आणि पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगतानाच, न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.

  • By विवेक
Updated On: Oct 06, 2026 | 08:39 PM
Ambadas danve- eknath shinde

Ambadas danve- eknath shinde

Follow Us
Follow Us:
  • प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील आरोपींचे CDR तपासण्याची अंबादास दानवेंची मागणी.
  • संतोष शिर्के यांच्या कार्यालयाची रेकी झाल्याचा आरोप; CCTV पुरावे असल्याचा दावा.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार; निष्पक्ष तपास आणि फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी
 

मुंबई : प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी भेट घेतली. यावेळी माजी खासदार राजन विचारेही उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत दानवेंनी राज्य सरकार आणि पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूर्णेकर कुटुंबीयांसह भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Pradeep Purnekar Murder Case)

‘तपास अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव?’

या प्रकरणातील आरोपींचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) पूर्णपणे तपासण्याची मागणी दानवेंनी केली. एफआयआरमध्ये नाव असलेल्या सर्व संबंधितांचे सीडीआर तपासले पाहिजेत, असे ते म्हणाले. तपास यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत नसल्याचा आरोप करत त्यांनी तपास अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव आहे, असा सवाल उपस्थित केला.

यावेळी दानवेंनी एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. “स्वतःला मसीहा समजणारे कुठे गेले? एवढ्या मोठ्या कार्यकर्त्याचा मुडदा पाडला तेव्हा इकडे का नाही आले?” असा सवाल त्यांनी केला.

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा

प्रदीप पूर्णेकर यांच्यासोबत काम करणारे पदाधिकारी संतोष शिर्के यांच्या कार्यालयाची रेकी करण्यात आल्याचा आरोपही दानवेंनी केला. यासंदर्भात व्हिडिओ आणि सीसीटीव्ही पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला.

‘पुरावे न्यायालयात सादर करणार’

तपास यंत्रणांनी योग्य तपास केला नाही, तर उपलब्ध पुरावे उच्च न्यायालयात सादर करू, असा इशारा दानवेंनी दिला. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष अधिकाऱ्याकडे सोपवावा आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारने एसआयटी स्थापन केली असली, तरी परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही, अशी टीका त्यांनी केली. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका मांडताना त्यांनी दोषींना फाशी देण्याची मागणी केली.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे लक्ष

गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून न्याय द्यावा, असे दानवे म्हणाले. पूर्णेकर कुटुंबीयांसह मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला नाही, तर आमच्याकडे वेगळे दरवाजे आहेत,” असा थेट इशारा दानवेंनी दिला. त्यामुळे या प्रकरणातील तपास, सरकारची भूमिका आणि पुढील न्यायालयीन हालचालींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Web Title: Pradeep purnekar murder case ambadas danve eknath shinde vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 08:39 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Eknath Shinde
  • Pradeep Purnekar
  • shivsena

संबंधित बातम्या

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश
1

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा
2

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा
3

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
4

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.