पुण्यातील हॉटेल्स, मेस बंद होणार? (फोटो- सोशल मीडिया)
पुणे शहराला ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखले जाते
युद्धामुळे हॉटेल, मेस बंद होण्याच्या मार्गावर
इंधन पुरवठ्यावर झाला मोठा परिणाम
सोनाजी गाढवे /पुणे: पुणे शहराला ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखले जाते. शिक्षणासाठीराज्यातील तसेच ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी शहरात येतात.याशिवाय रोजगारासाठी अनेक कामगारही शहरात वास्तव्यास असून, मात्र सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असून त्याचा फटका शहरातील हॉटेल,मेस आणि खानावळी व्यवसायाला बसू लागला आहे.
कमर्शियलगॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात मर्यादा येत असल्याने अनेक हॉटेल आणि मेस चालकां समोर मोठे संकट निर्माण झाले आहे. काही हॉटेलमध्ये फक्त दोन दिवसांचा गॅस साठा उरला असून काही मेसमध्ये केवळ एका दिवसापुरता साठा असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करून स्वयंपाक सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विजेवर स्वयंपाक केल्यास वीजबिल मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने हा पर्यायही दीर्घकाळ टिकणे कठीण असल्याचे हॉटेल आणि मेस चालकांनी सांगितले. गॅसचा पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही, तर काही हॉटेल आणि मेस बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
युद्धामुळे सामान्यांची उडाली धांदल; LPG गॅस सिलेंडर घेऊन पळू लागले लोक; VIDEO VIRAL
दरम्यान, शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही यामुळे चिंता वाढली आहे. अनेक विद्यार्थी मेस आणि खानावळींवरच अवलंबून असल्याने जेवणाची व्यवस्था बंद झाली तर अडचण निर्माण होणार आहे. काही विद्यार्थ्यांनी तर जेवणाची व्यवस्था बंद झाल्यास गावी परतण्याचा विचार करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कमर्शियलगॅस पूर्णपणे बंद झाला आहे. माझ्याकडे फक्त दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच गॅसशिल्लक आहे. त्यानंतर मला माझे ‘मुद्रा मिसळ’ हॉटेल बंद करावे लागणार आहे. भाडे द्यावे की गाळ्याचे भाडे भरावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे जोपर्यंत कमर्शियल गॅसचा पुरवठा पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत हॉटेल बंद ठेवावे लागेल.
-राजेंद्र साखरे,
मालक मुद्रा मिसळहॉटेल
कमर्शियलगॅस पूर्ण पणे बंद झाला आहे आणि आमच्याकडे फक्त एकच गॅस सिलेंडर शिल्लक आहे.त्यानंतर आम्ही काही प्रमाणात वीजेचा वापर करून काम चालवत आहोत; मात्र तेही परवडणारे नाही. त्यामुळेअशीच परिस्थिती राहिली तर आम्हाला मेस बंद करावे लागेल.
-ओमकार जाधव मेस व्यवसाय चालक
आम्ही महानगर गॅस पाईपलाईनसोबत जोडलेले आहोत. आम्हाला गॅस बंद ठेवण्यास सांगितले नाहीमात्र, आम्हाला २० टक्के कमी करायला सांगीतला आहे. त्यामुळे आम्ही हॉटेलमधील काही पदार्थ कमी केलेआहेत. परिस्थिती अशीच राहिली तर आम्हाला हॉटेलही बंद करावे लागेल. इतर हॉटेलव्यावसायिकांप्रमाणेच आमच्यावरही ही वेळ आली आहे.
-पांडुरंग पुजारी हॉटेल शिवसागर
कमर्शियल गॅसच्या टंचाईमुळे मेस बंद होण्याच्या मार्गावर असून, आम्ही सर्व विद्यार्थीमेसवरच अवलंबून आहोत. मेस बंद झाल्यास आमचे पुण्यात राहणे आणि शिक्षण घेणे कठीण होईल.
-रोहीत गाकवाड एमपीएसी विद्यार्थी
कमर्शियल गॅसच्या टंचाईमुळे माझ्या कडील गॅस पुर्ण संपले आहेत. आणि मी आता मेस बंद करणार आहे. तीन चार दिवसानी खरतर हे मुल कुठे जातील आता जेवणासाठी मला प्रश्न पडला आहे. शासनाने त्वरीत कमर्शियल गॅस ची व्यवसाता करावी ही माझी मागणी आहे.
-पल्लवी सांवत घरगुती मेस चालक
मित्रांचा मेस बंद आहेत. आणि जे चालु आहेत ते पण दरवाडीचा विचारात आहेत. पर्यायी मुलांना हॉटेल मधे राइस प्लेट घेऊन खावे लागत आहे, पण ते मुलांचा आवाकयाचा बाहेर जात आहे. बरीच मुले खुप दुरून इथं अभ्यासासाठी आली आहेत त्यांचे इथे कुणी नातेवाईक किंवा जवळचे असे फार कोणी नाही. जर असेच काही दिवस चालत राहिले तर विद्यार्याना आर्थिक आणि मानसिक त्रासासोबत पुणे सोडावे लागेल.
-अजय सोनावणे स्पर्धा विद्यार्थी






