Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Guardian Minister: कोणते ‘दादा’ होणार पुण्याचे पालकमंत्री? ‘या’ मंत्र्याने स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

Ajit Pawar Vs Chandrkant Patil: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकात पाटील यांच्यात पालकमंत्रीपदासाठी शर्यत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पालकमंत्री पदावरून नाराजीनाट्य पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 02, 2025 | 02:03 PM
Pune Guardian Minister: कोणते ‘दादा’ होणार पुण्याचे पालकमंत्री? ‘या’ मंत्र्याने स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: राज्यात महिन्याभरापूर्वी विधानसभा निवडणूक पार पडली. जनतेने महायुतीला संपूर्ण बहुमत दिले. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळ स्थापन झाले. दरम्यान आता कोणला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच पुण्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकात पाटील यांच्यात पुण्याच्या  पालकमंत्रीपदासाठी शर्यत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आता याबाबत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठे भाष्य केले आहे.

पुण्याचे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवारच असतील, असा दावा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे. यामुळे पुण्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत पुढील काळात नाराजीनाट्य पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील देखील पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याच्या पार्श्वभुमीवर भरणे यांचे वक्तव्य महत्वाचे ठरले आहे.

कोरेगाव भीमा येथे 207 व्या शौर्य दिनानिमित्त दत्तात्रय भरणे आले होते. यावेळी त्यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन खातेवाटप देखील झाले आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आलेली नाही. पालकमंत्रीपदासाठी प्रत्येक पक्षातील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच (अजित पवार गट) नेते दत्तात्रय भरणे यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना भरणे म्हणाले की, पुण्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात कोणतीही रस्सीखेच सुरू नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत योग्य निर्णय घेतील. पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत कोणी काहीही म्हणत असले तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हेच होतील, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, कोणाला मिळाली पॉवरफुल खाती?

५ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालय स्वत:कडे ठेवले आहे. तसेच गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण आणि खातेवाटप न झालेली इतर खाती त्यांच्यकडे आहेत.  एकनाथ शिंदे यांना नगरविकास खाते, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग देण्यात आले आहे. अजित पवार यांना अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क हे खाते देण्यात आले आहे.

हेही वाचा: मोठी बातमी; राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, कोणाला मिळाली पॉवरफुल खाती? वाचा संपूर्ण यादी

कॅबिनेट मंत्री खातेवाटप

1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ –  वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक –  वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे  – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले –  सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार

 

Web Title: Minister dattatray bharane said dcm ajit pawar is the guardian minister of pune district latest marathi new

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Dattatray Bharne
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर
1

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास…; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश
2

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास…; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…
3

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…

पावसाळी कामांचा हिशेब द्या, चार वर्षातील केलेली कामे दाखवा; महापालिका आयुक्तांकडे माजी पदाधिकाऱ्यांची मागणी
4

पावसाळी कामांचा हिशेब द्या, चार वर्षातील केलेली कामे दाखवा; महापालिका आयुक्तांकडे माजी पदाधिकाऱ्यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.