Rohit Pawar On Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर'वरून रोहित पवारांची शिवसेनेवर टीका; म्हणाले, "पुढे जाऊन ऑपरेशन मांजर अन्..."
पुणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्यावतीने राज्यात ऑपरेशन टायगर सुरू आहे. या अंतर्गत अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. अशातच शिवसेना पक्षाच्या ऑपरेशन टायगर वर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की आत्ता ऑपरेशन टायगर सुरू असून पुढे पुढे जाऊन ऑपरेशन मांजर ऑपरेशन कुत्रे सुरू होईल. एखाद्या संग्रहालयात खूप सारे वाघ ठेवले की एकमेकात ते भांडत असतात. सरकारमधील हे तिन्ही वाघ आपल्याला भांडताना दिसत आहेत, अशी टिका आमदार रोहित पवार यांनी केली.
पुण्यात आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेचे ऑपरेशन टायगर वर जोरदार टीका केली. आमदार पवार म्हणाले की, हे जे काही संग्रहालय काढण्याचं प्रयत्न भाजप तसेच मित्र पक्षाच्या वतीने होत आहे की उद्या त्यांच्यातच भांडण सुरू होतील. अशा ऑपरेशन टायगर मुळे स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते तसेच नेत्यांवर अन्याय होत असतो.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले की, बीडमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या दुर्दैवी आहेत.संतोष देशमुख कुटुंबियांना अपेक्षा होती की त्यांना न्याय मिळेल मात्र सरकारने फक्त आश्वासन दिले. बाकी काहीही केलं नाही यात भाजपचे एक आमदार विविध ठिकाणी सभा आंदोलन यामध्ये सहभागी होऊन मोठे मोठे भाषण करत होते.
हेही वाचा: ऑपरेशन टायगरने उडवली ठाकरे गटाची झोप! नाराज नेत्यांची मनधरणी सुरु
भाजप मुद्दामहुन त्यांना पुढे कशासाठी करत होत हे सगळ कळल पाहिजे.त्या ठिकाणी निवडणूक काळात फडणवीस सभा पण घेण्यासाठी जाऊ शकले नाहीत. धनंजय मुंडे यांची ताकद वंजारी समाजात कमी होत होती आणि पंकजा मुंडे यांची ओबीसीमध्ये ताकद वाढत होती. पुन्हा दोन बैठका झाल्या अस बावनकुळे यांनी स्वतःहा म्हटले. पंकजा मुंडे यांचं वाढत असलेलं वर्चस्व भाजपच्या काही लोकांना नको पाहिजे म्हणून ही चक्र फिरली. पण यात देशमुख आणि सूर्यवंशी परिवार न्यायापासून वंचित राहिला आहे. या दोन्ही प्रकरणात राजकारण झाले आहे.
महानगरपालिका निवडणुकीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या संकेतावर रोहित पवार यांना विचारला असता ते म्हणाले की कोर्टाने जर वेगळे सांगितलं असेल तर बावनकुळे यांना बऱ्याच काही गोष्टी कळतात. 25 फेब्रुवारीला यावर सुनावणी आहे यानंतर बाकी सगळ्या गोष्टी कळतील.निवडणुका पावसाळ्याच्या नंतर होतील अस वाटत आहे. हे सर्व न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे जास्त काही बोलता येत नाही अस यावेळी रोहित पवार म्हणाले.
अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की राहुल सोलापूरकर बाहेर आहेत की मेंटल हॉस्पिटलमध्ये आहेत हे चेक करा. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये मध्ये टाकलं पाहिजे.आता ते जर काही बोलेल तर त्यांना लोक सोडणार नाहीत. ते स्वतः बोलते की त्यांना पाठीमागून कोणी चाव्या देतात हे पाहिले पाहिजे .राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई होईल असं वाटत नाही.देशमुख,सूर्यवंशी यांना अजूनही न्याय मिळाला नाहीया सरकार कडून न्याय मिळेल अस वाटत नाही.राजकीय पाठबळ असणारी लोक बाहेर आहेत.अस यावेळी रोहित पवार म्हणाले.