Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात ‘कृषी भवन’ उभारण्यासाठी प्रयत्न करणार; शंकर मांडेकर यांचं आश्वासन

भोर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात 'कृषी भवन' उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शंकर मांडेकर यांनी आश्वासन दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 30, 2026 | 12:30 AM
भोर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात 'कृषी भवन' उभारण्यासाठी प्रयत्न करणार; शंकर मांडेकर यांचं आश्वासन

भोर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात 'कृषी भवन' उभारण्यासाठी प्रयत्न करणार; शंकर मांडेकर यांचं आश्वासन

Follow Us
Follow Us:

​भोर : भोर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा आणि शेतीविषयक सर्व सोयीसुविधा एकाच छताखाली मिळाव्यात, या उद्देशाने मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात ‘कृषी भवन’ उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.​ सह्याद्री मंगल कार्यालयात आयोजित मुख्यमंत्री पाणंद रस्ते योजना, खरीप हंगाम आणि पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांसह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

 

​यावेळी बैठकीत जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड यांनी कृषी विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. “कृषी विभागाने पुरवलेल्या निकृष्ट बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्याचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच मे २०२५ मधील अतिवृष्टीची मदत ‘फार्मर आयडी’ अभावी रखडल्याचे सांगत, प्रशासनाने यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. यावेळी नसरापूर ऐवजीभोर येथे तांदूळ महोत्सव घेण्याचे आश्वासन तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी दिले.

यावेळी माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या वीज तोडणीचा मुद्दा उपस्थित केला. महावितरणने कोणत्याही ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन तोडू नये आणि ७ एचपी पर्यंतच्या मोटरधारक शेतकऱ्यांना वीज बिलासाठी त्रास देऊ नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच कृषी विभागाने बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी स्पष्ट केले की, ज्या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्यांनी पंचायत समितीमार्फत तात्काळ प्रस्ताव सादर करावेत, पाहणी करून तातडीने टँकर सुरू केले जातील. भोर तालुक्यातून मुख्यमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत १९५ पैकी ८७ रस्त्यांचे प्रस्ताव पाठवण्यात आले असून, १३ कामांना मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक प्रस्ताव पाठवल्याबद्दल प्रांताधिकारी व तहसीलदारांचे यावेळी कौतुक करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे यांनी जलजीवन योजना पूर्ण होऊनही टँकर का लागत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर पाणी पातळी खालावलेल्या गावांतच टँकर दिले जात असल्याचे अभियंता मनीष भामरे यांनी स्पष्ट केले. या बैठकीला उपसभापती विशाल कोंडे, प्रवीण जगदाळे, तृप्ती खुटवड, राजेश बोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, डॉ. अभय तिडके यांच्यासह मोठ्या संख्येने सरपंच, ग्रामसेवक आणि शेतकरी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : हमीपत्र दिलेल्या विकसकांवर पाणीपुरवठ्याची जबाबदारी, दुर्लक्ष केल्यास…; आयुक्तांचा इशारा

Web Title: Mla shankar mandekar has given a major assurance to the farmers of the bhor assembly constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
1

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
2

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
3

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.