Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करा; मनसेचे सुहास निम्हण यांची मागणी

पुणे मनसेचे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याची एक महत्वाची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 15, 2026 | 02:04 PM
बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करा; मनसेचे सुहास निम्हण यांची मागणी

बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करा; मनसेचे सुहास निम्हण यांची मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे मनसेचे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याची एक महत्वाची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात बारामती बसस्थानकाचा ज्या धर्तीवर अत्यंत आधुनिक, देखणा, हायटेक आणि सर्वसुविधांयुक्त कायापालट केला आहे. ते आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वास्तू आहे. दादांच्या याच दूरदृष्टीचा आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीचा अवलंब करून पौड येथील बसस्थानकाचे नूतनीकरण करणे सहज शक्य आहे, असे निम्हण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पुणे जिल्हातील मुळशी तालुका हा पर्यटन, शिक्षण, आणि औद्योगिक दृष्ट्या वेगाने विकसित होत असलेला तालुका आहे. तालुक्यातील मुख्य पौड बसस्थानकाची जागा ही आमच्या खात्रीलायक माहितीप्रमाणे पूर्णपणे शासकीय मालकीची असून मोठी आहे. पुणे-कोलाड महामार्ग हा पौड मधूनच जात आहे पुढे हा महामार्ग मुंबई-गोवा महामार्गाला जोडला असल्याने कोकणात जाणारी वाहतूक कैक पटीने वाढली आहे. या संपूर्ण महामार्गावरील प्रवासी आणि पर्यटकांची वर्दळ लक्षात घेता “पौड” बसस्थानक हे मुख्य जंक्शन ठरणार आहे. भविष्यातील या वाढत्या वाहतुकीचा आणि पुढील १० वर्षांतील शहरीकरणाचा विचार करून पौड बसस्थानकाचा विस्तार वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे मनसेचे सुहास निम्हण म्हणाले. यावेळी अँन्थोनी आढाव, अनिल आहिरे, अनिल मातेरे, धनंजय टेमघरे, किशोर इंगवले, मोहन भिलारे, सुनिल भिलारे,सुभाष आमले उपस्थित होते.

सुहास निम्हण यांनी निवेदनात मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

१) पुणे-कोलाड महामार्ग व भविष्यातील गरजेचा विचार करून डिजिटल टाइम-टेबल डिस्प्ले, हाय-टेक सीसीटीव्ही यंत्रणा असलेली सुसज्ज इमारत.

२) पुण्याहून पौड व मुळशीतील इतर ठिकाणी जाण्यासाठी येणाऱ्या पीएमपीएमएल बसेस आणि राज्याच्या इतर भागातून येणाऱ्या एसटी बसेससाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म आणि एक मोठा बसथांबा.

३)चालक-वाहक व प्रवासी यांच्या रात्रीच्या मुक्कामासाठी बसस्थानक परिसरात सुसज्ज विश्रामगृह.

४) एसटीच्या प्रवाशांना विविध पाससाठी लाईनमध्ये ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून विशेष जलद बस पास केंद्र.

५) प्रवाशांच्या बस फेऱ्यांबाबतच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि एसटी महामंडळाच्या विविध सवलती योजनांचे (उदा. महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक सवलत) फायदे नागरिकांना थेट मिळवून देण्यासाठी एक मोठे केंद्रीय कार्यालय येथे सुरू करावे.

६) महामार्गावरील संभाव्य अपघात आणि आपत्कालीन प्रसंगी तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्थानक आवारातच २४ तास सुरु असणारे “प्राथमिक उपचार केंद्र” असावे तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था असावी.

७) सुसज्ज स्वच्छतागृह व महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारणी करणे.

पुणे-कोलाड महामार्गामुळे पौडचा होणारा कायापालट लक्षात घेता, भविष्यातील गरजा भागवण्यासाठी शासनाने हे पाऊल आत्ताच उचलणे अत्यंत गरजेचे आहे. तरी आपण या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन, संबंधित एसटी महामंडळ, पीएमपीएल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पौड येथील शासकीय जागेची संयुक्त पाहणी करून ‘भविष्याभिमुख आराखडा’ (Future-Ready Plan) तयार करण्याचे आदेश द्यावेत. अशा प्रकारचे निवेदन आज १४ ऑगस्ट २०२६ रोजी सुहास निम्हण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आमदार शंकर मांडेकर, खासदार सुप्रिया सुळे यांना पाठवले आहे.

हे सुद्धा वाचा : देवळ्याजवळ भीषण अपघात, बसने दुचाकीला चिरडले; मृत्यूचा आकडाही समोर

Web Title: Mnss suhas nimhan has demanded the renovation of the bus station at paud mulshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • paratp sarnaik
  • Sunetra ajit Pawar

संबंधित बातम्या

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
1

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल
3

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह
4

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.