Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC आंदोलनात रोहित पवारांचा पोलिसांना थेट अल्टिमेटम; ’15 मिनिटांत निर्णय घ्या, नाहीतर…’

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात वाहतुकीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. रोहित पवारांनी पोलिसांना 10 ते 15 मिनिटांत निर्णय घेण्याचा इशारा देत अलका टॉकीज चौकात ठिय्या देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर एस. एम. जोशी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 09, 2026 | 01:04 AM
Rohit Pawar MPSC Protest, Vivek Bhimanwar Resignation, Devendra Fadnavis

Rohit Pawar MPSC Protest, Vivek Bhimanwar Resignation, Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या दिशेने वाहने वळवल्याचा रोहित पवारांचा दावा.
  • 10 ते 15 मिनिटांत निर्णय न झाल्यास अलका टॉकीज चौकात बसण्याचा इशारा.
  • रोहित पवारांच्या भूमिकेनंतर एस. एम. जोशी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती.
 

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आज आणखी एक वळण मिळालं आहे. एस. एम. जोशी पुलाजवळ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दिशेने वाहतूक वळवली जात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असून एखादं वाहन विद्यार्थ्यांच्या पायावर गेल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

याच मुद्द्यावरून रोहित पवार पोलिसांवर चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांना पुढील 10 ते 15 मिनिटांत योग्य निर्णय घेण्याचा इशारा दिला. हा इशारा दिल्यानंतर आंदोलनस्थळी विद्यार्थीही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

’15 मिनिटांत निर्णय घ्या, नाहीतर अलका चौकात बसू’

रोहित पवारांनी पोलिसांना थेट इशारा देताना म्हटलं की, “पोलिसांनी पुढील 15 मिनिटात योग्य निर्णय नाही घेतला तर आम्ही अलका टॉकीज चौकात जाऊन बसावे लागेल.”

CJP Protest 10 October: १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी अभिजीत, सौरव आणि आशुतोषच्या अडचणी वाढणार? दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय

तसंच, “कृपा करुन इकडे वाहने डायव्हर्ट केल्याने त्यांना त्रास होतोय. तुम्हाला फोटो, व्हिडीओ काढून त्याचा वापर कोर्टात करायचा असेल तर मग आम्ही आमची ताकद दाखवू,” असंही त्यांनी म्हटलं.

गेल्या सात दिवसांपासून वाहतूक वळवण्यात आली होती; मात्र कालपासून आंदोलनाच्या दिशेने वाहने पाठवली जात असल्याचा दावा त्यांनी केला. “गाडी विद्यार्थ्यांच्या पायावर वगैरे गेली तर मग अवघड आहे,” असंही पवार म्हणाले.

‘अलका चौकात बसलो तर उठणार नाही’

यानंतर रोहित पवारांनी पोलिसांना आणखी 10 ते 15 मिनिटांचा वेळ देण्याचं सांगितलं. अलका चौकात जाऊन बसल्यास तिथून उठणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, रोहित पवारांच्या या भूमिकेनंतर एस. एम. जोशी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आंदोलनस्थळाबाबत नोटिसा दिल्या असल्या तरी विद्यार्थी मागे हटणार नाहीत, असा इशाराही पवारांनी दिला.

पोलिसांकडून आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या सूचना

MPSC आंदोलनाचा आज आठवा दिवस असून पुणे पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही कारवाई केली जात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलिसांच्या व्हॅनमधूनही आंदोलकांना शांततेने आंदोलन थांबवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानेही सामान्य पुणेकरांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

MPSC आंदोलन पुढे कुठे जाणार?

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनात MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्या मांडल्या जात आहेत. आंदोलनाची व्याप्ती वाढत असताना विविध राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.

पुण्यातील आंदोलन मुंबईच्या दिशेने हलवण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता प्रशासन आणि आंदोलकांमध्ये पुढील काही तासांत काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागलं आहे.

Rajendra Pawar Message to Rohit Pawar: लढ संघर्ष अटळ आहे….;राजेंद्र पवारांची रोहित पवारांसाठी भावनिक पोस्ट

Web Title: Mpsc protest pune rohit pawar police warning alka talkies chowk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • MPSC
  • Pune Police
  • rohit pawar
  • Student Protest

संबंधित बातम्या

MPSC Protest : आंदोलनात सदावर्तेंची एंट्री; ‘विद्यार्थ्यांवर मालकी हक्क दाखवू नका’, थेट सुनावलं
1

MPSC Protest : आंदोलनात सदावर्तेंची एंट्री; ‘विद्यार्थ्यांवर मालकी हक्क दाखवू नका’, थेट सुनावलं

Pune MPSC Students Protest: एस.एम. जोशी पुलावरील आंदोलन स्थळ रिकामे करा!; पुणे पोलिसांचे MPSC विद्यार्थ्यांना आदेश
2

Pune MPSC Students Protest: एस.एम. जोशी पुलावरील आंदोलन स्थळ रिकामे करा!; पुणे पोलिसांचे MPSC विद्यार्थ्यांना आदेश

France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक
3

France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक

Rajendra Pawar Message to Rohit Pawar: लढ संघर्ष अटळ आहे….;राजेंद्र पवारांची रोहित पवारांसाठी भावनिक पोस्ट
4

Rajendra Pawar Message to Rohit Pawar: लढ संघर्ष अटळ आहे….;राजेंद्र पवारांची रोहित पवारांसाठी भावनिक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.