Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Protest : आंदोलनात सदावर्तेंची एंट्री; ‘विद्यार्थ्यांवर मालकी हक्क दाखवू नका’, थेट सुनावलं

MPSC Protest : पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थी आंदोलनाला आता राजकीय रंग चढला आहे. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या गुणरत्न सदावर्तेंनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत 'विद्यार्थी गुरेढोरे नाहीत' असं म्हणत राजकीय हस्तक्षेपावर जोरदार टीका केली.

  • By विवेक
Updated On: Oct 08, 2026 | 03:17 PM
gunratna sadavarte

gunratna sadavarte

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात गेल्या 12 दिवसांपासून MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे.
  • गुणरत्न सदावर्तेंनी विद्यार्थ्यांना भेटून परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास कायम राहण्याची गरज व्यक्त केली.
  • ‘MPSC विद्यार्थ्यांवर मालकी हक्क दाखवू नका, दळभद्री राजकारण करू नका’, असा थेट इशारा त्यांनी दिला.
MPSC Protest : पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलनावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. राज्यातील विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. अश्यातच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही यावर मोठी प्रतिक्रिया दिली असून “कोणाच्याही मागे जायला विद्यार्थी गुरेढोरे नाहीत,” असं वक्तव्य केलं आहे.

गेल्या 12 दिवसांपासून पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु असून एस एम जोशी मार्गावर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलक ठिय्या मांडून बसले आहेत. एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलक अडून बसले आहेत. याबाबत सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठे विधान केले आहे.

नेमकं काय म्हणाले सदावर्ते ?

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत ज्या भावना आहेत, त्याच माझ्याही आहेत. परीक्षेवरील विश्वास कायम राहिला पाहिजे. ‘विद्यार्थी गुरेढोरे नाहीत की कोणाच्याही मागे जातील,’ असं म्हणत त्यांनी आंदोलनातील विद्यार्थ्यांवर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने मालकी हक्क दाखवू नये, असं सुनावलं.

Rajendra Pawar Message to Rohit Pawar: लढ संघर्ष अटळ आहे….;राजेंद्र पवारांची रोहित पवारांसाठी भावनिक पोस्ट

आयोगाच्या कामकाजाबाबत ज्यांना माहिती आहे, त्यांनीच त्यावर बोलावं, असंही सदावर्ते यांनी म्हटलं. काही लोकांना विषयाची माहिती नसतानाही ते बोलत असल्याची टीका त्यांनी केली.

‘तुमचं दळभद्री राजकारण करू नका’

MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी मूळ प्रश्नावर चर्चा व्हावी, अशी भूमिका सदावर्तेंनी मांडली. ‘महाराष्ट्रातील MPSC विद्यार्थ्यांवर मालकी हक्क दाखवू नका. तुमचं दळभद्री राजकारण करू नका,’ असा थेट इशाराही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे गेलं होतं, चर्चा झाली होती आणि काही मुद्द्यांवर एकमत झाल्याचा दावाही त्यांनी केला.

‘आम्ही इथे जेवायला नाही, अधिकारी व्हायला आलोय’

सदावर्ते यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना उद्देशून परीक्षेच्या तयारीवर आणि भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं. ‘आपण इथे जेवायला आलेलो नाही, तर अधिकारी व्हायला आलो आहोत,’ असं त्यांनी म्हटलं.

त्याचवेळी परीक्षा वेळेवर होण्यासाठी नेमकी जबाबदारी कोणाची आहे, सरकारला या प्रक्रियेत किती अधिकार आहेत आणि आयोगाच्या कार्यपद्धतीवर चर्चा का होत नाही, असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

आयोगातील व्यक्तींना हटवण्याच्या मागण्यांपेक्षा आयोगाच्या परीक्षा पद्धती, कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास या मुद्द्यांवर चर्चा होणं गरजेचं असल्याचं सदावर्ते म्हणाले. त्यामुळे पुण्यातील MPSC आंदोलनाला आता राजकीय पाठिंब्यासोबतच विविध भूमिका आणि आरोप-प्रत्यारोपांचं वळण मिळालं आहे.

CJP Protest : 10 ऑक्टोबरला दिल्ली दणाणणार? CJPच्या आंदोलनाला आता शेतकऱ्यांचा पाठिंबा; ‘बॅरिकेड्स तोडण्यासाठी ट्रॅक्टर तयार’

Web Title: Mpsc protest gunratna sadavarte rohit pawar pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Gunratna Sadawarte
  • MPSC
  • rohit pawar
  • Student Protest

संबंधित बातम्या

Pune MPSC Students Protest: एस.एम. जोशी पुलावरील आंदोलन स्थळ रिकामे करा!; पुणे पोलिसांचे MPSC विद्यार्थ्यांना आदेश
1

Pune MPSC Students Protest: एस.एम. जोशी पुलावरील आंदोलन स्थळ रिकामे करा!; पुणे पोलिसांचे MPSC विद्यार्थ्यांना आदेश

France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक
2

France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक

Rajendra Pawar Message to Rohit Pawar: लढ संघर्ष अटळ आहे….;राजेंद्र पवारांची रोहित पवारांसाठी भावनिक पोस्ट
3

Rajendra Pawar Message to Rohit Pawar: लढ संघर्ष अटळ आहे….;राजेंद्र पवारांची रोहित पवारांसाठी भावनिक पोस्ट

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
4

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.