पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत खबळजनक वक्तव्य केल होत. ‘मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असं ते म्हणाले होते. लाखनी तालुक्यातील निवडणूक प्रचारात जेवनाळा येथे केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच भाजपचे मंत्री आणि पदाधिकारी यांच्याकडून पाटोळे यांच्यावर टीकाही होऊ लागली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा नाना पटोले यांना ट्विटरच्या माध्यमातून सणसणीत टोला लगावला आहे. पटोले यांनी पुण्याच्या येरवड्यात दाखल व्हावे असा सल्ला दिला आहे.
मोहोळ म्हणाले, नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या. आणि पुण्यातल्या ‘येरवड्या’त दाखल व्हा. तुमची बौद्धिक कुवत आणि मानसिक स्थिती पाहता, हेच योग्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर नावापुरता का होईना, पण ‘राष्ट्रीय’ पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने मा. पंतप्रधानांबद्दल काय बोलावं, याचं काडीचही भान असू नये? असा सवालही मोहोळ यांनी उपस्थित केला आहे.