Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युरेका! LPG ला पर्याय सापडला! पुण्यनगरीत शास्त्रज्ञांनी केली कमाल; तयार केला ‘हा’ जबरदस्त गॅस

पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमधील डॉक्टर तिरूमलाईवामी राजा आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या टीमने गेले 20 वर्ष प्रचंड मेहनत करून हा गॅस तयार करण्यात यश मिळाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 14, 2026 | 04:18 PM
युरेका! LPG ला पर्याय सापडला! पुण्यनगरीत शास्त्रज्ञांनी केली कमाल; तयार केला 'हा' जबरदस्त गॅस

युरेका! LPG ला पर्याय सापडला! पुण्यनगरीत शास्त्रज्ञांनी केली कमाल; तयार केला 'हा' जबरदस्त गॅस

Follow Us
Follow Us:

एलपीजीला पर्याय ठरेल अशा वायूचा शोध लावण्यात यश
एनसीएलचे शास्त्रज्ञ डॉ. तिरूमलाईस्वामी राजा यांचं मोठं संशोधन
व्यावसायिक वापरासाठी डीएमई गॅसचं उत्पादन करण्यात यश

Pune News:  सध्या देशभरात इराण इस्त्रायल युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा असल्याचे समोर येत आहे. दरम्यान केंद्र सरकारने याबाबत कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. अंतर ग्राहकांनी गॅस सिलेंडरसाठी केंद्रांवर एकच गर्दी केली आहे. एलपीजी गॅस नसल्याने त्याचा फटका हॉटेल, कारखाने, मेस यांना बसत आहे. असे असतानाच पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमधील शास्त्रज्ञांनी एलपीजीला पर्याय ठरू शकेल असे डायमिथाइल अ डीमई (DME) गॅसची निर्मिती करण्यात यश मिळवले असल्याचे समोर येत आहे.

पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमधील डॉक्टर तिरूमलाईवामी राजा आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या टीमने गेले 20 वर्ष प्रचंड मेहनत करून हा गॅस तयार करण्यात यश मिळाले आहे. हा गॅस तयार करण्यासाठी आवश्यक असणारे उत्पेरक प्रयोगशाळेत तयार करण्यात यश मिळवले आहे.

स्वयंपाकघर सध्या अडचणींच्या भोवऱ्यात? LPG चा तुटवडा अन् उद्योगधंद्यावरही परिणाम

हा प्रयोग आता केवळ कागदावर नसून आता रोज 250 किलो ‘डीएमई’वायूचे उत्पादन केले जात आहे. या गॅसचे उत्पादन झाल्यास एलपीजी गॅसमध्ये 8 टक्के हा गॅस मिसळता येणार आहे. यामुळे एलपीजीवर दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

या डीएमई गॅसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यास त्याची किंमत एलपीजी पेक्षा कमी असेल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. पुण्यात तयार करण्यात आलेला हा वायु पूर्णपणे स्वदेशी आहे. आता मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी औद्योगिक कंपन्यांशी करार करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

Ratnagiri News: ग्राहकांनो…; रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी LPG बाबत केले ‘हे’ आवाहन

स्वयंपाकघर सध्या अडचणींच्या भोवऱ्यात?

अखेर, गॅस संकटामुळे, केंद्र सरकारला आवश्यक वस्तू देखभाल कायदा (ESMA) लागू करावा लागला. भारतात इंधनाच्या प्रश्नावर चिंता पसरली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक रोखली आहे, जी जगातील २० टक्के इंधनाची वाहतूक करते. सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, कतार आणि युएई येथून भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरियाला होणारा कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा या सामुद्रधुनीतून थांबवण्यात आला आहे. येथून ८४ टक्के तेल आशियाई बाजारपेठेत पोहोचते. या अडथळ्यामुळे एलपीजी आणि एलएनजीचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. जर लवकरच यावर उपाय शोधला गेला नाही तर त्याचा परिणाम प्रत्येक स्वयंपाकघरावर होईल. भारताला त्याच्या एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) पैकी 90 टक्के भाग आखाती देशांमधून मिळतो.

Web Title: National chemical laboratory scientist create dme gas option for lpg after 20 years research in pune iran israel war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Gas Cylinder
  • LPG gas cylinder
  • pune news

संबंधित बातम्या

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
1

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
2

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
3

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद
4

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.