Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी, पुण्यात राष्ट्रवादीसमोर नवा चेहरा देण्याचे आव्हान; ‘या’ नावाची जोरदार चर्चा

पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ग्रामीण नेतृत्वाला संधी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 24, 2026 | 06:26 PM
विधान परिषद निवडणुकीत अभयसिंह जगताप यांना राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी

विधान परिषद निवडणुकीत अभयसिंह जगताप यांना राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ग्रामीण नेतृत्वाला संधी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पक्ष स्थापनेपासून गेल्या अडीच दशकांत ग्रामीण भागातील नेत्यांना या मतदारसंघातून प्रतिनिधित्वाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांऐवजी ग्रामीण भागातील तरुण, उच्चशिक्षित आणि अनुभवी नेतृत्वाला संधी द्यावी, अशी भावना जिल्ह्यातील अनेक नेते आणि गावपुढाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

या मतदारसंघातील एकूण ८११ मतदारांपैकी तब्बल ५१८ मतदार ग्रामीण भागातील आहेत, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील मतदारांची संख्या मिळून २९३ इतकी आहे. त्यामुळे ग्रामीण मतदारांचे प्रमाण शहरांच्या तुलनेत जवळपास दुप्पट असूनही नेतृत्व मात्र शहरांकडेच केंद्रीत राहिल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

अडीच दशकांचा राजकीय इतिहास

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाली. त्याआधी १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. रामकृष्ण मोरे विजयी झाले होते. त्यांचा कार्यकाळ २००४ पर्यंत असला तरी २००३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सासवडचे तत्कालीन नगराध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ चंदुकाका जगताप विजयी झाले. मात्र त्यांना केवळ आठ-नऊ महिन्यांचाच कार्यकाळ मिळाला. २००४ मध्ये पिंपरी-चिंचवडचे लक्ष्मण जगताप अपक्ष म्हणून विजयी झाले. त्यानंतर २००९ मध्ये त्यांच्या विधानसभेवरील निवडीमुळे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण बिनविरोध निवडून आल्या. यानंतर २०१० आणि २०१६ च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले विजयी झाले. त्यांचा कार्यकाळ ५ डिसेंबर २०२२ रोजी संपला. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नियुक्त असल्याने गेल्या चार वर्षांपासून ही जागा रिक्त आहे.

ग्रामीण भागाला केवळ नऊ महिन्यांचे प्रतिनिधित्व

सन १९९८ ते २०२२ या कालावधीत ग्रामीण भागाला केवळ आठ ते नऊ महिन्यांचे प्रतिनिधित्व मिळाले. तेही चंदुकाका जगताप यांच्या माध्यमातून. दुसरीकडे पुणे शहराला वंदना चव्हाण आणि अनिल भोसले यांच्या माध्यमातून सुमारे ११ वर्षे, तर पिंपरी-चिंचवडला प्रा. रामकृष्ण मोरे आणि लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून जवळपास १० वर्षे प्रतिनिधित्व मिळाले.

हे सुद्धा वाचा : महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले, ग्राहकांसह व्यापारीही चिंतेत; वापरातील वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ

रणजित शिवतरे यांच्या नावाची चर्चा

यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. रणजित शिवतरे यांनी जिल्हा परिषदेत बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती तसेच उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते उच्चशिक्षित, तरुण आणि अनुभवी नेतृत्व असल्याचे सांगितले जात आहे. तसेच भोर तालुका बारामती लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्या भागाला राजकीय बळकटी देण्यासाठीही त्यांच्या नावाला प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा आहे.

१९९८ नंतरचे सदस्य

  • प्रा. रामकृष्ण मोरे (काँग्रेस) — १९९८ ते २००३
  • चंद्रकांत ऊर्फ चंदुकाका जगताप (काँग्रेस) — २००३ ते २००४
  • लक्ष्मण जगताप (अपक्ष) — २००४ ते २००९
  • वंदना चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस) — २००९ ते २०१०
  • अनिल भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस) — २०१० ते २०१६
  • अनिल भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस) — २०१६ ते २०२२
  • डिसेंबर २०२२ पासून जागा रिक्त.

Web Title: Ncp faces a big challenge in pune legislative council elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Election News
  • NCP News
  • Sunetra ajit Pawar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.