Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांसाठी दाखले वितरणासाठी विशेष मोहिम राबवा; रोहन सुरवसे पाटील यांची मागणी

प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक विविध दाखले वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याची मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 07, 2026 | 12:46 PM
विद्यार्थ्यांसाठी दाखले वितरणासाठी विशेष मोहिम राबवा; रोहन सुरवसे पाटील यांची मागणी

विद्यार्थ्यांसाठी दाखले वितरणासाठी विशेष मोहिम राबवा; रोहन सुरवसे पाटील यांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांसाठी दाखले वितरणासाठी विशेष मोहिम राबवा
  • रोहन सुरवसे पाटील यांची मागणी
  • मागणीचे निवेदन सुरवसे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले
पुणे : इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे तसेच लवकरच १० वीचा निकाल लागणार असल्याने प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक विविध दाखले वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली आहे. मागणीचे निवेदन सुरवसे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे.

 

प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, एसईबीसी, नॉन-क्रीमीलेयर, ईडब्ल्यूएस, डोमिसाइलसह विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. निकालानंतर मोठ्या प्रमाणावर पालक व विद्यार्थी महा-ई-सेवा केंद्रे, सेतू कार्यालये आणि नागरी सुविधा केंद्रांमध्ये गर्दी करत असल्याने सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्या वारंवार उद्भवत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाऊनची समस्या अधिक तीव्र झाली असून, त्यामुळे नागरिकांना आवश्यक दाखले वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी व पालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून, प्रवेश प्रक्रियेच्या ऐनवेळी कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या तांत्रिक समस्या तातडीने दूर कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध दाखले शासकीय दरानुसार आणि वेळेत उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रशासनाने विशेष शिबिरे किंवा मोहिम राबवावी, अशी मागणी सुरवसे पाटील यांनी निवदेनातून केली आहे.

तसेच अनेक महा-ई-सेवा केंद्रांमध्ये शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक महा-ई-सेवा केंद्राच्या दर्शनी भागात शासनमान्य दरपत्रक लावणे बंधनकारक करावे, अशी मागणीही रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त आहे.

हे सुद्धा वाचा : नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर महापौर अ‍ॅक्शन मोडवर; महापालिका आयुक्तांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Web Title: Ncp leader rohan survase patil has made a big demand from the district collector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • NCP Workers
  • pune news

संबंधित बातम्या

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
1

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
3

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
4

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.