Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : प्रचार सुनेत्रा काकींचा महायुतीचा नाही…; रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा

Rohit Pawar Baramati : बारामती पोटनिवडणुकीसाठी आमदार रोहित पवार हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी भूमिका स्पष्ट करुन भाजपवर निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 16, 2026 | 03:29 PM
Rohit Pawar on the Baramati By election targets BJP over Karuna Munde Independent Candidacy

Rohit Pawar on the Baramati By election targets BJP over Karuna Munde Independent Candidacy

Follow Us
Follow Us:

Baramati by election : बारामती : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुक होत आहे. अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याचा आणि पक्षाचा कारभार हाती घेतला आहे. बारामतीमध्ये पोटनिवडणूकीसाठी जोरदार प्रचार केला जात आहे. सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवार गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे देखील प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. मात्र रोहित पवारांनी ते सुनेत्रा पवारांच्या प्रचार करत असून महायुतीचा करत नसल्याचे म्हणत भूमिका स्पष्ट केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामती पोटनिवडणुकीतील प्रचाराबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ते फक्त सुनेत्रा काकींसाठी प्रचार करत असून प्रचार महायुतीसाठी नाही असे म्हटले आहे. त्याचबरोबर रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “भाजपचे नेते सुनेत्रा काकींचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. परंतु असं करण्यामागे त्यांचा उद्देश वेगळा काय आहे हे माहीत नाही. पण जर तसं असेल तर त्यांनी बारामतीकरांना ओळखलं नाही,” असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

हे देखील वाचा : : छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४१.४ अंशांवर! प्रशासनाकडून ‘हीट वेव्ह’चा इशारा; आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’ मोडवर

सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रोहित पवारांनी भेटीगाठी वाढवल्या असून कोपरसभा आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. रोहित पवार म्हणाले की, “खरंतर बारामती पोटनिवडणुक ही बिनविरोध झाली पाहिजे होती. मात्र निवडणुकीमध्ये जे 22 ते 23 अपक्ष उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. ते राहिला नको होते. अजित पवार यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून जो उमेदवारीचा आकडा 60 होता तो 22 ते 23 वर आणला,” असे मत रोहित पवारांनी व्यक्त केले.

करुणा मुंडेंचा अर्ज हा भाजपचा डाव? 

पुढे ते म्हणाले की, “अपक्ष उमेदवारांच्या यादीमध्ये एक नाव करुणा मुंडे यांचे आहे. भाजपच्या एखाद्या बड्या नेत्याने त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी उमेदवारी अर्ज ठेवला नसता. याच्या मागचं कारण असं की महाविकास आघाडीचे सरकार गेलं आणि त्यावेळी आम्ही सर्व आमदारांनी सह्या करून अजित पवार यांना विरोधी पक्ष नेता म्हणून निवडलं होतं. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वात धनंजय मुंडे हे भाजपवर जोरदार टीका करत होते. ज्या अधिवेशनात धनंजय मुंडे भाजपा विरुद्ध बोलत होते. त्याच अधिवेशनात एका भाजपच्या मोठ्या नेत्याने करुणा मुंडे यांना आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली. आणि त्या पत्रकारांशी बोलल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून धनंजय मुंडे यांनी भाजपावर टीका करणे सोडून दिलं. त्यामुळे मला वाटतं की भाजपच्या कोणत्याही नेत्याने करुणा मुंडे यांना सांगितलं असतं तर त्यांनी तो फॉर्म ठेवला नसता,” अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे रोहित पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला.

हे देखील वाचा : “जनाची नाही तर मनाची तरी ठेवा” ; लोकदरबारात MMRDA अधिकाऱ्यांवर मंत्री प्रताप सरनाईकांचा संताप

पुराज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही रोहित पवार यांना डिवचलं आहे. रोहित पवार यांनी ‘बारामतीत बाहेरून येऊन समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील,’असा टोला लगावला.

Web Title: Rohit pawar on the baramati by election targets bjp over karuna munde independent candidacy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Baramati by-election
  • rohit pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

‘शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही’; रोहित पवारांचा ठाम विश्वास, संजय दिना पाटील यांच्या वर्तनावरही टीका
1

‘शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही’; रोहित पवारांचा ठाम विश्वास, संजय दिना पाटील यांच्या वर्तनावरही टीका

Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी  सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! ‘या’ दोन मोठ्या योजना  पालिकेकडे हस्तांतरित
2

Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! ‘या’ दोन मोठ्या योजना पालिकेकडे हस्तांतरित

Sharad Pawar Faction: महाराष्ट्रात पुन्हा भूकंप? उद्धव ठाकरेंसोबतच आता शरद पवारांचे ५ खासदार भाजपच्या संपर्कात!
3

Sharad Pawar Faction: महाराष्ट्रात पुन्हा भूकंप? उद्धव ठाकरेंसोबतच आता शरद पवारांचे ५ खासदार भाजपच्या संपर्कात!

‘RTI कायद्यात बदल करुन प्रशासनातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठीचं..,’ रोहित पवार यांचा राज्य सरकारवर निशाणा
4

‘RTI कायद्यात बदल करुन प्रशासनातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठीचं..,’ रोहित पवार यांचा राज्य सरकारवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.