Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळा की पावसाळा? Pune शहरात हवामानाचा लपंडाव; पुढील दोन दिवसांत….

पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (दि. ४) कमाल तापमान स्थिर राहिले तर किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान तर १७.१ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 04, 2026 | 08:45 PM
उन्हाळा की पावसाळा? Pune शहरात हवामानाचा लपंडाव; पुढील दोन दिवसांत….
Follow Us
Follow Us:

दोन दिवसांपूर्वी पुण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस
अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल
हवामान बदल होण्याची शक्यता

पुणे: गेल्या चार दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र, शुक्रवारी (दि. ३) रोजी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हवामानाच्या स्थितीत बदल झाला. पावसाने दिलेल्या या उसंतीमुळे पुण्याचे किमान तापमान २ अंश सेल्सिअसने वाढले असून, पुढील दोन दिवसांत हवामानात आणखी किरकोळ बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि स्थानिक पातळीवर वाढलेल्या उष्णतेमुळे ढगांची निर्मिती होत आहे. यामुळे शहरात गेल्या २४ तासांपासून अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या बदलामुळे दुपारच्या वेळी जाणवणारा उन्हाचा तडाखा काहीसा कमी झाला असून, सायंकाळच्या सुमारास किंवा रात्री पुणे शहर आणि परिसरातील उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात.

पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (दि. ४) कमाल तापमान स्थिर राहिले तर किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान तर १७.१ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर अंशतः ढगाळ राहिले. रविवारी (दि. ५) शहर आणि परिसरात ३५ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान तर १८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. तसेच रविवारपासून चार दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

पुण्यात अवकाळीचा हाहाकार

अवकाळी पावसाने गुरुवारी शहरात कहर केला. घरात पाणी शिरणे, झाडपडी, रस्त्यांवर पाणी तुंबणे, सीमा भिंत कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. शहरात २६० ठिकाणी पाणी तुंबले तर ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटनांची नोंद झाली. यात सिंहगड रस्त्यावर झाड पडल्याने एक महिला मृत्यूमुखी पडली. विशेषतः शहराच्या दक्षिण आणि पश्चिम भागात अति मुसळधार पावसाने गुरुवारी दुपारी झोडपले. या पावसाने पुन्हा एकदा महापालिकेच्या पावसाळापूर्व कामाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार; पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत, एका महिलेचा मृत्यू

पुण्यातील प्रमुख रस्त्यासह काही भागाला नद्यांचे स्वरूप आले होते. अग्निशमन दल, पुणे पोलिस पालिका प्रशासनाने रस्त्यावर उतरून साचलेले पाणी काढण्यासोबतच रस्त्यावरून झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक भागात नागरिकांनीच स्वतःहून रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, अनेक भागात वाहने पाण्यात अडकली गेली. वाहने मध्येच बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली. तर दुसरीकडे काही रस्त्यांवर चार ते पाच फुट पाणी साचल्याने रस्ताच काही तास बंद ठेवण्याची वेळ आली. शहरातील केडवीनगर, सिंहगड रोड, बाणेर, बालाजीनगर, विश्रांतवाडी, स्वारगेट, कोथरूड, धायरी, वाकड, हडपसर, वारजे, डंकेवाडी या भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते.

Web Title: Next few days pune weather change rain marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Pune Weather
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

ओतुर बस स्थानकात साचले तळे, रोगराईची भीती; पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल
1

ओतुर बस स्थानकात साचले तळे, रोगराईची भीती; पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल

पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला ‘अलर्ट’ राहण्याचे निर्देश
2

पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला ‘अलर्ट’ राहण्याचे निर्देश

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने चाकण शहराला झोडपले; जनजीवन विस्कळीत
3

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने चाकण शहराला झोडपले; जनजीवन विस्कळीत

देशभरातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; महाराष्ट्रासह हिमाचलला पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी
4

देशभरातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; महाराष्ट्रासह हिमाचलला पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.