Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला ‘अलर्ट’ राहण्याचे निर्देश

पावसाचा जोर पाहता, कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने पूर्णपणे सतर्क राहावे, असे कडक निर्देश महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 05, 2026 | 03:53 PM
पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला 'अलर्ट' राहण्याचे निर्देश

पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला 'अलर्ट' राहण्याचे निर्देश

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पावसाचा जोर पाहता, कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने पूर्णपणे सतर्क राहावे, असे कडक निर्देश महापौरांनी दिले आहेत. महापौर लांडगे यांनी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शहरातील सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

 

पिंपरी- चिंचवड शहरातील सखल भाग, पाणी साचणारी ठिकाणे, नाले, सबवे, पूरप्रवण क्षेत्रे, धोकादायक झाडे, जुन्या-जीर्ण इमारती आणि रस्त्यांची सद्यस्थिती या बाबींची त्यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली. तसेच आपत्कालीन यंत्रणा कितपत सज्ज आहे, याचाही त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.

महापौरांनी प्रशासनाला दिलेल्या प्रमुख सूचना

२४ तास सतर्कता : सर्व क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने २४ तास ‘अलर्ट मोड’वर राहून प्रत्यक्ष जमिनीवर (फील्डवर) कार्यरत राहावे.

तक्रारींवर तात्काळ कारवाई : नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची वाट न पाहता, संभाव्य धोके ओळखून आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

सुरक्षेला प्राधान्य: उघडे मॅनहोल, पाण्याचा निचरा न होणारी ठिकाणे, धोकादायक झाडे आणि विद्युत खांबांमधील बिघाड यांसारख्या नागरिकांच्या जिवाशी निगडित बाबींवर तातडीने मार्ग काढावा. यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा : पोह्यात आळी अन् भातात सापडले झुरळ, अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; कँटीन परवाना केला निलंबित

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

महापौरांनी प्रशासनासोबतच नागरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अत्यंत आवश्यक काम नसल्यास पावसादरम्यान घराबाहेर पडणे टाळावे. तसेच पाणी साचलेले रस्ते, उघडे नाले, विद्युत खांब, तुटलेल्या तारा आणि धोकादायक झाडांच्या आसपास जाणे टाळावे. शहरात कुठेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी किंवा जवळच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे त्यांनी म्हटले आहे.

“नागरिकांच्या जीवापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून संभाव्य धोके वेळेत दूर करावेत. सुरक्षित पिंपरी-चिंचवड हेच आपले सामूहिक उत्तरदायित्व आहे.” — रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड.

हे सुद्धा वाचा : ‘लालपरी’ची ज्ञानयात्रा, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना एसटीचे सुरक्षित पंख! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Web Title: Mayor ravi landge has reviewed the situation in pimpri chinchwad city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Pimpri Chinchwad
  • Rain News
  • Ravi Landge

संबंधित बातम्या

राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…
1

राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
2

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…
3

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.