Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकच्या TCS नंतर आता पुण्यातील Infosys मध्ये लव्ह जिहादचा डाव? IT क्षेत्रात उडाली खळबळ

Pune Infosys Love Jihad : आयटी कंपनीमध्ये जिहादी प्रकरणे वाढली असून नाशिकनंतर पुण्यामध्ये देखील हे प्रकार घडत असल्याचे दिसून आले आहे. यावर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 15, 2026 | 03:17 PM
Nitesh Rane takes cognizance of allegations Infosys Pune on regarding Love Jihad

Nitesh Rane takes cognizance of allegations Infosys Pune on regarding Love Jihad

Follow Us
Follow Us:

Pune Infosys Love Jihad : पुणे : मागील काही दिवसांपासून भारताचे आयटी केंद्र असलेल्या महाराष्ट्रातून कॉर्पोरेट जगताशी संबंधित धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांना लक्ष्य करुन लव्ह जिहादचा जाळे टाकले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिकच्या टीसीएस या मोठ्या कंपनीतील लैंगिक छळ आणि धर्मांतराचे प्रकरण ताजे असताना पुण्यातून देखील असाच आरोप करणारी घटना समोर आली आहे. आता इन्फोसिस पुणेच्या (Pune News) एका माजी कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर आवाहन

इन्फोसिसच्या एका माजी कर्मचाऱ्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांना टॅग करून एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पुण्यातील इन्फोसिस कंपनीमध्ये देखील जिहादी छळ सुरु आहे. खास करुन बीपीएमच्या डायमलर प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या अनेक मुली जिहादी छळाला बळी पडत आहेत. असा धक्कादायक आरोप या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. यामुळे पुण्यासह महाराष्ट्रामध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हे देखील वाचा : बंगालच्या निवडणुकीपूर्वी ED चा दणका; I-PAC सह-संस्थापक विनेश चंदेल यांना अटक

संबंधित ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर यावर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी देखील रिप्लाय दिला आहे. तक्रारदाराने भाजप आमदार नितेश राणे यांनाही टॅग केले होते, ज्यावर राणे यांनी तात्काळ प्रतिसाद दिला. राणे यांनी प्रकरणाची दखल घेतली, कर्मचाऱ्याचे आभार मानले आणि पुढील माहितीसाठी थेट संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

Dear sir @NiteshNRane @Dev_Fadnavis there are many girls complaining about jihadi harassment going on in @InfosysBPM Pune , especially Damler Project
Can you please look into it
— 🧠 (@BackupBrainy) April 12, 2026

पुण्यातील नामांकित इन्फोसिस कंपनीवर आरोप झाल्यानंतर कंपनीने त्यांची स्पष्ट भूमिका मांडली आहे. इन्फोसिस कंपनीने सांगितले आहे की, “पुण्यातील ‘इन्फोसिस BPM’ (Infosys BPM) मध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना छळाचा सामना करावा लागत असल्याचा दावा करणाऱ्या काही सोशल मीडिया पोस्ट्सची इन्फोसिसला (Infosys) माहिती आहे. कोणत्याही प्रकारचा छळ किंवा भेदभाव यांबाबत इन्फोसिस ‘शून्य-सहिष्णुता’ (zero-tolerance) धोरण अवलंबते,” अशी भूमिका कंपनीने घेतली आहे.

त्याचबरोबर, “ज्या ज्या क्षेत्रांमध्ये किंवा अधिकारक्षेत्रांमध्ये कंपनी कार्यरत आहे, त्या सर्व ठिकाणी सुरक्षित, सर्वसमावेशक, सकारात्मक आणि सन्मानजनक कामाचे वातावरण उपलब्ध करून देण्यास कंपनी कटिबद्ध आहे. लागू असलेल्या कायद्यांशी सुसंगत राहून, कोणत्याही तक्रारींचे किंवा समस्यांचे निवारण करण्यासाठी कंपनीकडे सुस्थापित धोरणे आणि भक्कम यंत्रणा उपलब्ध आहेत. आमच्या कार्यक्षम प्रक्रियेनुसार, तक्रार म्हणून नोंदवल्या गेलेल्या कोणत्याही मुद्द्याची गंभीर दखल घेतली जाते आणि एका स्वतंत्र समितीद्वारे त्याची चौकशी केली जाते. याव्यतिरिक्त, कंपनीकडे अनेक माध्यमांद्वारे राबवले जाणारे प्रतिबंधात्मक कार्यक्रम उपलब्ध आहेत; यामध्ये ‘स्पिक-अप’ (speak-up) संस्कृतीचाही समावेश आहे, जी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कोणत्याही समस्या किंवा शंका निर्भीडपणे मांडण्यासाठी प्रोत्साहित करते. आपल्या ‘आचारसंहिते’शी (Code of Conduct) सुसंगत राहून, नैतिकता, सचोटी आणि कामाच्या ठिकाणचे वर्तन यांबाबतचे सर्वोच्च मापदंड कायम राखण्यास इन्फोसिस सदैव कटिबद्ध आहे.” अशी ठाम भूमिका इन्फोसिस कंपनीकडून मांडण्यात आली आहे.

टीसीएस नाशिक प्रकरण काय आहे?

नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीच्या आठ महिला आणि एका पुरुष कर्मचाऱ्यांनी कंपनीमध्ये घडलेल्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. नाशिकमधील पीडितांचा आरोप आहे की, त्यांचा केवळ मानसिक आणि लैंगिक छळच झाला नाही, तर त्यांच्यावर गोमांस खाण्यासाठी, नमाज पढण्यासाठी आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठीही दबाव आणला गेला.

निदा खान कोण आहे?

नाशिक पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. तपासात निदा खान ही मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निदा खानने तरुण महिला कर्मचाऱ्यांना प्रेमप्रकरणात गुंतवून त्यांचे शोषण केले. एसआयटीला असे आढळून आले की, पीडितांना त्यांच्या धार्मिक चालीरीती आणि पोशाख बदलण्यासाठीही प्रभावित केले जात होते.

हे देखील वाचा : सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? अजित पवारांचं स्वप्न पूर्ण होणार? खासदारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Web Title: Nitesh rane takes cognizance of allegations infosys pune on regarding love jihad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Love Jihad Case
  • MLA Nitesh Rane
  • pune news

संबंधित बातम्या

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
1

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू
2

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…
3

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…

पुणेकरांनो, शहर परिसरात येताय? तर थांबा ! वाहतुकीतील ‘हे’ बदल एकदा जाणून घ्या
4

पुणेकरांनो, शहर परिसरात येताय? तर थांबा ! वाहतुकीतील ‘हे’ बदल एकदा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.